नाशिक : सततच्या परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची देखील भरपाई (giving money to help farmers) देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत देतो आहे. जे निकषात बसत नव्हते, त्यांनाही सततच्या पावसाने झालेल्या नुकसानची भरपाई दिली जाईल. काल परवा झलेल्या पावसाचे पंचनामे करून मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले. नाशिक (Nashik) येथे आज सारथी कार्यालयाच्या उद्घाटन (occasion inauguration of Sarathi office) प्रसंगी मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. सारथी कार्यालयाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना मोठा फायदा होईल. दीड एकर मध्ये वसतिगृहची व्यवस्था आणि कार्यलय बांधले जाईल. ज्यामध्ये 500 मुले व 500 मुलींची सोय होईल, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : मराठा आरक्षणावर देखील सरकारने काम सुरू केले आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठी वकिलांची फौज उभी करू, मराठा समाजाची योग्य बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणटले.
अधिकाऱ्यांना सूचना : दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी योग्य पावले उचला. यासाठी सर्व अधिकारऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. CM Eknath Shinde