ETV Bharat / state

Bus Operator Strike Nashik : सिटी लिंक बस वाहकांचा संप; प्रवाशांची गैरसोय - सिटी लिंक बस

मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने नाशिक शहरातील सिटी लिंक बस वाहकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सकाळपासूनच बस सेवा ठप्प असल्याने विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Bus Operator Strike Nashik
सिटी लिंक बस
author img

By

Published : Jul 18, 2023, 3:39 PM IST

सिटीलिंक बस चालकांनी उगारले संपाचे हत्यार

नाशिक : शहर महापालिकेचा सिटी लिंक बससेवा प्रकल्प दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. ही बससेवा सुरू झाल्यापासून महापालिकेला 2 वर्षांत तब्बल 70 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. मागील दोन वर्षांत ठेकेदाराला कोट्यवधी रुपये देऊनही 500 वाहकांचे तीन महिन्यांचे वेतन थकल्यामुळे त्यांनी आज पहाटेपासून संप पुकारला आहे. यामुळे शहरातील बससेवा ठप्प झाली आहे. बससेवा सुरू झाल्यापासून वाहकांचा हा चौथा संप आहे. प्रत्येकवेळी ठेकेदाराला इशारा देण्यापलीकडे महानगरपालिका काहीही कारवाई करत नाही. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

तीन महिन्यांचे वेतन थकले : नाशिक महापालिकेने 8 जुलै 2021 ला गाजावाजा करत शहरात सिटी लिंक बससेवा सुरू केली. तत्पूर्वी नाशिकमध्ये एस.टी. महामंडळाकडून बससेवा चालवली जात होती. मात्र, महापालिकांनी बससेवा चालवावी या भूमिकेतून त्यांनी शहर बससेवा बंद केली. यामुळे नाशिक महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतील विरोधी सदस्यांनी या बससेवेला विरोध केला होता. तरीही शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणे महापालिकेची जबाबदारी असल्यामुळे 2021 मध्ये ही बससेवा सुरू झाली. महापालिकेच्या माध्यमातून सध्या 250 बसेस सुरू असून यात 200 सीएनजी तर 50 डिझेल बसेस आहेत. याशिवाय 25 इलेक्ट्रिक बस खरेदीची प्रक्रियाही सध्या सुरू आहे. यात बस ठेकेदाराच्या असून चालक-वाहक पुरवण्याची जबाबदारीही त्याच्याकडे आहे. चालक-वाहक पुरवण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठेकेदार संस्थांची नियुक्ती केली आहे. वाहकांची सेवा पुरवणाऱ्या मॅक्स सेक्युरीटीज या कंपनीने पाचशे वाहकांचे तीन महिन्याचे वेतन अद्यापही दिले नसल्यामुळे या वाहकांनी संप पुकारला आहे.

बस सेवा तोट्यात : शहरामध्ये प्रवासी मिळो ना मिळो ठेकेदाराला प्रतिबस दिवसाला 200 किलोमीटरमागे 17 हजार रुपयांचे भाडे लागत आहे. यामुळे महापालिकेला ही बससेवा चालवण्यासाठी प्रत्येक दिवशी 25 लाख रुपयांचा खर्च करावा लागत आहे. मागील दोन वर्षांमध्ये सिटीलिंकमुळे महापालिकेने 70 कोटी रुपये तोटा सहन केला. पुढील दोन वर्षांमध्ये ही रक्कम 140 ते 150 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रवाशांची गैरसोय : सकाळपासून संप पुकारल्यामुळे सिटीलिंक बससेवा ठप्प आहे. यामुळे शाळा-महाविद्यालय तसेच कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांची गैरसोय झाल्याचे बघावयास मिळाले. महापालिकेच्या म्हणण्यानुसार त्यांनी संबंधित ठेकेदाराला एप्रिलच्या वेतनाची रक्कम दिली आहे. यानंतर त्यांनी मे व जूनमधील देयके सादर केलेली नाहीत. यामुळे ठेकेदाराकडून वेतन दिले जात नाही.

वेतन वेळेवर मिळाले पाहिजे: आम्ही आमचे काम प्रामाणिक करत आहे. मागील तीन महिन्यांपासून आम्हाला वेतन मिळाले नाही. त्यामुळे आम्ही घर खर्च कसा भागवावा असा प्रश्न आमच्यासमोर आहे. याआधीही तीन ते चार वेळा अशाच प्रकारे पगार थकले होते. त्यानंतर संप पुकारल्यावर वेतन देण्यात आले होते. नाशिक महानगरपालिकेने हस्तक्षेप करून ठेकेदारांशी चर्चा करून यापुढे वेतन रखडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे एका बस चालकाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.