नाशिक - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांना वर्तवली आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे यंत्रणेसह सर्वांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे मत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. दोन दिवसीय नाशिक दौर्यावर असताना शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
तिसर्या लाटेचा धोका बघता यंत्रणेने तयारी ठेवली पाहिजे -
पहिल्या लाटेत आपल्याला बेडची कमतरता जाणवली नाही. परंतु दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आता तिसर्या लाटेचा धोका बघता यंत्रणेने तयारी ठेवली पाहिजे. तज्ज्ञांना तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सगळ्यांनी सजग राहून जबाबदारी स्विकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अनाथ मुलांना परस्पर दत्तक घेणे पूर्णत:अवैध -
कोरोनामुळे आई-वडिलांचे निधन झाल्याने अनेक लहान मुले अनाथ झाली आहे. असे प्रकार आढळल्यास महिला बालकल्याण विभागाला अथवा जिल्हाधिकार्यांना माहिती द्यावी. अशा अनाथ मुलांना परस्पर दत्तक घेणे पूर्णत: अवैध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही मुलाची अनधिकृतपणे देवाण-घेवाण होऊ नये, यासाठी योग्य ते नियोजन करावे. तसेच स्थलांतरीत महिला व बालकांना योग्य त्या सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. नाशिक जिल्ह्यात कोरोना काळात जिल्हा परिषदेने राबविलेली ‘एक मूठ पोषण आहार’ हा उपक्रम अत्यंत स्तूत्य असून यामुळे उपक्रमामुळे बालकांचे कुपोषण कमी होण्यास नक्कीच मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
निर्भया फंड ग्रामीण भागात मिळाला तर चांगलं काम करता येईल -
यशोमती ठाकूर यांनी नाशिक येथील महिला बालविकासच्या 'वन स्टॉप सेंटर' येथे भेट दिली. तेथील पाहणी करत उपस्थित अंगणवाडी सेविकेच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कुमारी मातांच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले आहे. हे प्रमाण आदिवासी भागात जास्त आहे. त्याबाबत कशा अधिक उपाय योजना करता येतील, त्यासंदर्भात अभ्यास सुरू आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - भिवंडीत ब्रश कंपनीमध्ये भीषण आग; 13 गोदामे जळून खाक