ETV Bharat / state

Fir Against CM's Son : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभवसह १४ जणांवर नाशिक मधे फसवणुकीचा गुन्हा - charged with fraud

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा (Rajasthan Cricket Association) अध्यक्ष वैभव ( Vaibhav Gehlot ) याच्यासह 14 जणांविरुध्द नाशिक मघे फसवणुकीचा गुन्हा ( charged with fraud) दाखल झाला आहे. त्यांच्यावर राजस्थान सरकारच्या जाहिरातीच्या माध्यमातुन मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्यवसायिकाला तब्बल 6 कोटी 80 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. त्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

Vaibhav Gehlot
वैभव गेहलोत
author img

By

Published : Mar 20, 2022, 9:59 AM IST

Updated : Mar 20, 2022, 10:39 AM IST

जोधपूर / नाशिक : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याच्यासह 14 संशयीतांवर शनिवारी नाशिक जिल्ह्यात फसवणुकीच्या गुन्ह्यात दाखल झाला आहे. नाशिक येथील सुशील बालचंद्र पाटील यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या ओळखीचा हवाला देत गुजरात काँग्रेसचे नेते सचिन वालेरा यांनी आपल्यावर प्रभाव पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पाटील यांनी केलेल्या तक्रारीत म्हणले आहे की, वलेरा यांनी सांगितले की, ते अभिक अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत राजस्थान सरकारसाठी काम करतात. त्यांनी पाटील यांना मोठा परतावा आणि सरकारी कराराचे आश्वासन दिले त्यामुळे पाटील यांनी एकूण 3.93 कोटी रुपये विविध 13 बँक खात्यांत स्लीपिंग पार्टनर म्हणून गुंतवले, त्यांचा सहभाग व्यवसायाला भांडवल पुरवण्यापुरताच मर्यादित होता. पण वलेरा यांनी परताव्याचे वचन दिल्याप्रमाणे त्यांना 19 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. त्यांनी रकमेवरील व्याजासह 6.8 कोटी रुपयांची फसवणूक केली. वैभव गेहलोत हे देखील त्यांच्यासोबत काम करत होते, असे वलेरा यांनी सांगितले होते. मात्र, मी पैसे वापस मागण्यासाठी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला पैसे देणे बंद केले. तसेच जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा वलेरा म्हणाला, 'मी तुमचे वैभवजींशी बोलणे करुन देतो' आणि त्याने एकदा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे माझी त्यांच्याशी ओळख करून दिली, पाटील म्हणाले. वैभवने मला काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्र आहोत तुमचे पैसे परत मिळतील," असे सांगितले होते.

सहा महिन्यांपासून वलेराचा शोध लागत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, वैभवने त्याच्यावरील सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी ट्विटरवर, सांगितले की या प्रकरणाचा माझा कसलाही संबंध नाही "ज्या प्रकरणात माझे नाव आले आहे, त्याबाबत माध्यमांमधे ज्याप्रकारे चर्चा सुरू आहे, मला अशा कोणत्याही गोष्टीची माहिती नाही आणि माझा या सगळ्याशी काही संबंध नाही. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे खोटे आरोप तसेच अशा हेराफेरी येतात हे तुम्हाला माहिती आहेच "

नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गंगापूर रोड, नाशिक येथील सुशील पाटील यांनी तक्रार दिली. त्या नुसार 2018 ते 2020 या कालवधीत पाटील आणि त्यांच्या संबंधित संशयीत सचिन पुरुषोत्तम वेलेरा, वैभव गेहलोत (दोघे रा. जोधपूर), किशन कांतेलिया, सरदारसिंह चौहान, नीडल क्राफ्ट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी प्रवीणसिंह चौहान, सुहाभ मकवाल, निरोवभाई विमाभट, राजबीरसिंह शेखावत, बिस्वरंजन मोहंती, सावनकुमार पारनेर, विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, विराज पंचाल, रिशिता शाह यांनी संगनमत करुन राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीचे सर्व कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Maharashtra | A complaint has been filed against 16 people incl Vaibhav Gehlot hailing from Rajasthan & Gujarat. FIR filled by a person named Sushil Patil alleging that he was duped by crores of rupees,said Riyaz Shaikh, Senior Police Inspector, Gangapur Police Station, Nashik.

    — ANI (@ANI) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Mar 20, 2022, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.