ETV Bharat / state

'गो बॅक' म्हणत छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी शिंपडलं गोमूत्र; कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर अखेर भुजबळांनी अर्धवट सोडला दौरा

Chhagan Bhujbal Yeola Visit : राज्यात आरक्षणावरुन मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. आज मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील येवला दौऱ्यावर आले असताना, त्यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 2:42 PM IST

Updated : Nov 30, 2023, 2:57 PM IST

भुजबळांच्या दौऱ्यावरुन नाशिकमध्ये राडा

येवला Chhagan Bhujbal Yeola Visit : ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर असून पावसानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना या पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलक प्रचंड विरोध करताना दिसले. आमचं नुकसान आम्ही बघून घेऊ, तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका, अशा प्रतिक्रिया मराठा समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहेत.

भुजबळांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे : मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा येवला तालुक्यातील सोमठाण देश या गावात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल होताच, यावेळी गावातील मराठा आंदोलकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला. त्यांच्या ताफ्याला आंदोलकांनी पाठ दाखवून काळे झेंडे दाखवले. गाड्यांचा ताफा जाताना 'भुजबळ गो बॅक' अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली.

शहरातील विंचूर चौफुलीवर विरोध : आज भुजबळांचा ताफा येवला शहरातून जाणार असल्यानं शहरातील विंचूर चौफुली इथं सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत भुजबळांच्या येवला दौऱ्याला विरोध केला. यावेळी भुजबळ हे आपल्या येवला संपर्क कार्यालयात निघाले, असताना विंचूर चौफुली इथं आंदोलक असल्यानं भुजबळ यांनी आपला मार्ग बदलत दुसऱ्या मार्गे पाहणी दौऱ्याला निघून गेले.

लासलगावतही दाखवले काळे झेंडे : लासलगाव येथील कोटमगाव इथं देखील मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी 'भुजबळ गो बॅक' अशा घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भुजबळांचा दौरा आटोपल्यानंतर रस्त्यावर शिंपडलं गोमूत्र : ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ सोमठाण देश गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दौरा आटोपल्यानंतर भुजबळ ज्या रस्त्यानं गेले, त्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. भुजबळ रस्त्यावरुन निघून गेल्यानंतर इथल्या मराठा आंदोलकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडून घोषणाबाजी दिली. तर काही आंदोलकांनी अर्धनग्न होत काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेध केला.

हेही वाचा :

  1. आरक्षण मिळालं तर राजीनामा देईल म्हणणारे गरळ ओकतात, नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांना टोला
  2. मी धमक्यांना घाबरत नाही, मला कोणी गावबंदी करू शकत नाही; मंत्री छगन भुजबळांची आक्रमक भूमिका

Last Updated : Nov 30, 2023, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.