ETV Bharat / state

छगन भुजबळांनी वैजापूरमधून निवडणूक लढवावी; वैजापूर विकास नागरी कृती समितीचे निवेदन - दुष्काळ

छगन भुजबळांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीने भुजबळांना निवेदन दिले आहे. याच दरम्यान भुजबळांनी येवला मतदारसंघ सोडून जाऊ नये, यासाठी येवल्यातील नागरिकांनी संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

छगन भुजबळांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी
author img

By

Published : Jul 12, 2019, 8:05 PM IST

Updated : Jul 12, 2019, 8:37 PM IST

नाशिक - छगन भुजबळांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीने भुजबळांना निवेदन दिले आहे. याच दरम्यान भुजबळांनी येवला मतदारसंघ सोडून जाऊ नये, यासाठी येवल्यातील नागरिकांनी संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

वैजापूर विकास नागरी कृती समितीचे छगन भुजबळांना निवेदन

येवला मतदारसंघात मागील १५ वर्षांपासून छगन भुजबळ आमदार म्हणून नेतृत्व करत आहे. या मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे करून येवल्याचा चेहरामोहरा बदलला. तर या पुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी, यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीच्यावतीने आज वैजापूर येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळने शेकडो कार्यकर्त्यांसह येवला संपर्क कार्यालयात येऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली.

वैजापूर मतदारसंघ हा येवला मतदारसंघापासून जवळ असूनही विकासापासून कोसो मैल दूर आहे. वैजापूर मागास परिस्थितीत असून वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायेत खितपत पडला आहे. या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सक्षम नेतृत्व असल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपणास आम्ही सक्षम नेतृत्व म्हणून पाहतो, असे म्हणत भुजबळांना शिष्टमंडळाने निवेदन केले.

यावेळी छगन भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेत आभार मानले. ते म्हणाले, की मी गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय काम करत असून जनतेची सेवा करणे हा माझा उद्देश आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रतिनिधीकडे मांडणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे वैजापूर आणि येवल्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. मी त्याचा आदर करतो.

विधानसभेची निवडणूक भुजबळ कुटुंबीयातील केवळ दोनच व्यक्ती लढणार आहे. एकावेळेस ३ लोक लढणार नाही. मी कोणत्या मतदारसंघातून लढवू, याबाबत पक्ष निर्णय घेणार आहे. परंतु, आपल्या भावना पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहोचवू, असे त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

Intro:छगन भुजबळांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवावी- वैजापूर विकास नागरी कृती समितीचा भुजबळांना निवेदन

Body:छगन भुजबळांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवावी यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीनं भुजबळांना निवेदन, ह्याच दरम्यान भुजबळांनी येवला मतदारसंघ सोडून जाऊ नये या साठी येवल्यातील नागरिकांनी संपर्क कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन केल..

येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून छगन भुजबळ आमदार म्हणून नेतृत्व करत आहे..ह्या मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे करून येवल्याचा चेहरामोहरा बदलला आहे,
या पुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य यांनी वैजापूर मधून उमेदवारी करावी यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीच्या वतीने आज वैजापूर येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळने शेकडो कार्यकर्त्यां सह येवला संपर्क कार्यालयात येऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली ,

वैजापूर मतदारसंघ हा येवला मतदार संघ पासून जवळ असूनही विकासापासून कोसो मैल दूर आहे,वैजापूर मागास परिस्थितीत अजूनही वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायेत खितपत पडला आहे, वैजापूर मतदारसंघाला विकास करण्यासाठी सक्षम नेतृत्व शिवाय पर्याय नाही आपणास आम्ही सक्षम नेतृत्व म्हणून पाहतो असं म्हणत भुजबळांना शिष्टमंडळाने निवेदन केलं,यावेळी छगन भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेत आभार मानले, ते म्हणाले की मी गेल्या पन्नास वर्षांपासून राजकारणात सक्रिय काम करत असून जनतेची सेवा करणे हा उद्देश आहे,त्यामुळे कुठे उमेदवारी करावी याबाबत पक्ष स्तरावर निर्णय घेतला जाईल, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रतिनिधीकडे मांडने हा त्यांचा अधिकार आहे ,त्यामुळे वैजापूर येवल्यातील कार्यकर्त्यांनी आपला आपल्या भावना मांडल्या मी त्याचा आदर करतो,विधानसभेची निवडणूक भुजबळ कुटुंबियातील केवळ दोनच व्यक्ती लढणार आहे,एकावेळेस तीन लोक करणार नाही,मी कोणत्या मतदारसंघातून लढवू या बाबत पक्ष निर्णय घेणार असून आपल्या भावना पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहोचू असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले...

nsk- bhujba viu 1
nsk- bhujba viu 2
nsk- bhujba viu 3
nsk- bhujba viu 3

Conclusion:
Last Updated : Jul 12, 2019, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.