ETV Bharat / state

मराठा समाज भुजबळांवर नाराज, विधानसभेत फटका बसेल का? - मराठा विरुद्ध ओबीसी

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केलाय. यामुळे आता मराठा समाज छगन भुजबळांवर नाराज आहे. याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असं आता बोललं जातंय.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 7:55 PM IST

पाहा व्हिडिओ

येवला (नाशिक) Chhagan Bhujbal : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केल्यानंतर, मराठा समाज भुजबळांवर नाराज असल्याचं चित्र आहे. याचा फटका आता भुजबळांना येत्या विधानसभेत बसू शकतो. दुसरीकडे, भुजबळांच्या येवला मतदारसंघात मात्र ओबीसी समाजाचा त्यांना पाठिंबा आहे.

मराठा समाजाचं साखळी उपोषण : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून ग्रामीण भागात ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. येवल्यातील तहसील कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून हे आंदोलन सुरू असून, या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजानं येथे भजन आंदोलन, मुंडन आंदोलन, श्राद्ध आंदोलन असं विविध प्रकारचं आंदोलनं करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

ओबीसींचा विरोध : नाशिकमधील येवला लासलगाव हा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ. येथे भुजबळांचा ओबीसी समाज मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करतोय. राजापूर येथे गेल्या चार दिवसांपासून ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करू नये, तसंच ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशा या आंदोलकांच्या मागण्या आहेत.

भुजबळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी : येवला तालुक्यातील मातुलठान, कातरणी, वडगाव, सायगाव, अंदरसुल या गावात गाव बंदीचे फलक लावण्यात आले होते. मात्र छगन भुजबळ यांच्या अंबड येथील वक्तव्यानंतर ते फलक फाडण्यात येत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलाय. यानंतर येवल्यातील तहसील कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आलं. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली.

भुजबळच निवडून येतील : छगन भुजबळ २००४ पासून येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष चालू असला तरी, सर्व समाज भुजबळांच्या पाठीशी असल्याचं भुजबळ समर्थक सांगतात. मतदारसंघात विकास कामांना प्राधान्य देण्यात येत असल्यानं येत्या विधानसभेत भुजबळ मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? मनोज जरांगेंच्या दाव्यानं खळबळ
  2. 'भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा', मराठा आंदोलकांची मागणी
  3. मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात मराठा समाजाचे जोरदार शक्तिप्रदर्शन; जरांगे पाटील यांचा सरकारवर कारस्थान केल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.