ETV Bharat / state

मी धमक्यांना घाबरत नाही, मला कोणी गावबंदी करू शकत नाही; मंत्री छगन भुजबळांची आक्रमक भूमिका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 9:40 AM IST

Updated : Nov 30, 2023, 12:22 PM IST

Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्यभर रान उठलं आहे. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

Chhagan Bhujbal
मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ

येवला Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात रोजच हमरीतुमरी पाहायला मिळतेय. दरम्यान, आता गावबंदीच्या मुद्द्यावर बोलताना "मी धमक्यांना घाबरत नाही, कोणी मला गाव बंदी करू शकत नाही", अशी आक्रमक भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली.

येवला तालुक्यात अवकाळी पावसानं नुकसान : येवला तालुक्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ बुधवारी (29 नोव्हेंबर) येवला मतदार संघात दौऱ्यावर आले होते. यावेळी भुजबळ समर्थकांनी..कोण आला रे कोण आला, येवल्याचा वाघ आला, अशी घोषणाबाजी देत त्यांचं स्वागत केलं. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, "कोणी मला गावबंदी करू शकत नाही. गावबंदी केली तर एक महिन्याची सजा असून हा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत लिहिला आहे. तसंच सोशल मीडियावर येणाऱ्या धमक्यांना मी घाबरत नाही", अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ : सध्या सोशल मीडियावर गाव बंदीचे मॅसेज मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. यासंदर्भात मराठा समाजाला काय सांगाल, असं मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं होतं. यावेळी भुजबळ म्हणाले की, "99 टक्के मराठा समाज माझ्यासोबत आहे. सोशल मीडियावर गावात येऊ नका, म्हणून मॅसेज पसरवला जातोय. मात्र, मी नुकसानाच्या पाहणीसाठी गावात जाणारच. ज्यांना मला भेटायचं ते मला भेटतील, ज्यांना नाही भेटायचं ते नाही भेटणार. मात्र, मला कोणी गावबंदी करू शकत नाही, ती केली तर एक महिन्याच्या सजेला पात्र व्हाल" असंही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही : पुढं ते म्हणाले की, "हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये लिहिला असून मी मागेच घटना वाचून दाखवलीय. ज्यांना मला शेत दाखवायचंय ते दाखवतील, ज्यांना नाही दाखवायचं ते दाखवणार नाहीत. मी येवल्यात विकासासाठी आलो असून विकास केला म्हणून चार वेळा निवडून आलोय. या अगोदरपासून मी ओबीसीचं काम करत आलोय. सोशल मीडियावरील अशा धमक्यांना भुजबळ घाबरत नसून मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण त्यांना वेगळं आरक्षण द्या म्हणजे त्यांना व्यवस्थित आरक्षण मिळेल आणि ते कोर्टात टिकणारं देखील असावं. तसंच मराठा समाजातील जी शाहणी माणसं आहेत, त्यांच्याच हे लक्षात येईल" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. 'लोकांना कापण्यापेक्षा'; बच्चू कडूंचा छगन भुजबळांना सल्ला
  2. छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीत बोलावं, 'खोके' सरकारमध्ये स्पष्टता नाही - सुप्रिया सुळे
  3. छगन भुजबळांनी जातिवाचक शब्द काढला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा; जरांगेंची मागणी

Last Updated : Nov 30, 2023, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.