ETV Bharat / state

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागत - छगन भुजबळ

नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातून आघाडीकडून काँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते.

छगन भुजबळ, राष्ट्रवादी नेते
author img

By

Published : Oct 3, 2019, 5:06 PM IST

Updated : Oct 3, 2019, 5:45 PM IST

नाशिक - भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या यादीत एकनाथ खडसे यांचे नाव न आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता यावर खडसे काय निर्णय घेणार, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खडसे राष्ट्रवादीत येणार का? विचारले असता, भुजबळ यांनी खडसे जर भाजपमधून राष्ट्रवादीत आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ, राष्ट्रवादी नेते

हेही वाचा - उमेदवारी जाहीर न केल्याने आमदार बाळासाहेब सानप नाराज

नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातून आघाडीकडून काँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. यावेळी खोसकर यांच्याबद्दल वातावरण चांगलं असून पुन्हा आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. भाजपने बहुजनांवर अन्याय केला आहे. राज्यात सरकारविरुद्ध नाराजी असून आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त भुजबळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - नाशकात बाळासाहेब सानपांच्या उमेदवारीवर टांगती तलवार, 21 नगरसेवकांचे राजीनामे

ठाकरे घराण्याने आजपर्यंत अगदी माझ्यासहीत अनेक जणांना नगरसेवक, महापौर बनवले. मात्र, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे कधीच रिंगणात उतरले नव्हते. आदित्य ठाकरे यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक तरुण नेता पुढे येतोय. त्यामुळे आदित्य ठाकरेंना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा. मनसेने आदित्य विरोधात उमेदवार दिला नाही, हा निर्णय योग्यच आहे. शेवटी ठाकरे घराणे एकच असल्याचे भुजबळ यांनी सागितले.

Intro:भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या यादीत एकनाथ खडसे यांचं नाव न आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे खडसे पुढे कुढला निर्णय घेणार हे
ठरत असताना विरोधी पक्षातून विविध प्रतिक्रिया येत आहे नाशिक मध्ये देखील पत्रकारांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खडसे राष्ट्रवादीत येणार का विचारले असता भुजबळ यानी भाजपा पक्षाने खडसेंवर अन्याय केला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले जर खडसे राष्ट्रवादीत आले तर त्यांचे स्वागतच आहेBody:नाशिकच्या इगतपुरी मतदार संघातून आघाडीकडून काँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. यावेळी खोसकर यांच्या बद्दल वातावरण चांगलं असून पुन्हा आघाडीचाच उमेदवार इगतपुरीत निवडुन येईल भाजपा पक्षाने बहुजनांवर अन्याय केला आहे राज्यात सरकारविरुद्ध नाराजी असून आघाडीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केलाय..

बाईट - छगन भुजबळ - नेते, राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:ठाकरे घराण्यांने आजपर्यंत अनेक जणांना अगदी माझ्यासहित नगरसेवक महापौर बनविले पण बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे कधीच रिंगणात उतरले नव्हते आदित्य ठाकरे यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक तरुण नेता पुढे येतोय आदित्य ठाकरे यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा आहेत मनसेने आदित्य विरोधात उमेदवार दिलेला नाही हा निर्णय योग्यच शेवटी घराणं एकच असल्याचे भुजबळ यानी सागितले..
Last Updated : Oct 3, 2019, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.