ETV Bharat / state

CORONA : मनमाडच्या चांदशावली बाबांचा उरुस रद्द; ग्रामपंचायतीचा निर्णय

मनमाडजवळ असलेल्या पानेवाडी या गावात चांदशावली बाबांचा दर्गा आहे. याठिकाणी शेकडो वर्षांपासुन होळीच्या सणानंतर मोठा उरूस अर्थात यात्रोत्सव भरविण्यात येतो. मात्र, जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनोचा संसर्ग होऊ नये म्हणून हा उरुस रद्द करण्यात आला आहे.

nashik
CORONA : मनमाडच्या चांदशावली बाबांचा उरुस रद्द; कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय
author img

By

Published : Mar 18, 2020, 1:43 PM IST

नाशिक - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनमाड जवळच्या पानेवाडी येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या चांदशावली बाबांचा उरूस या वर्षी रद्द करण्यात आला आहे. चांदशावली बाबांची पूजा करून नैवेद्य दाखवणार असून शासनाने दिलेल्या आदेशानुसार यावर्षी होणारा उरूस रद्द केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

CORONA : मनमाडच्या चांदशावली बाबांचा उरुस रद्द; कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय

हेही वाचा - नाशिकातील मंदिरे राहणार बंद; प्रशासनाचा निर्णय

मनमाडजवळ असलेल्या पानेवाडी या गावात चांदशावली बाबांचा दर्गा आहे. याठिकाणी शेकडो वर्षांपासुन होळीच्या सणानंतर मोठा उरूस अर्थात यात्रोत्सव भरविण्यात येतो. मात्र, जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनोचा संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने राज्यशासनाने अध्यादेश काढून सर्व धर्माच्या यात्रा, जत्रा, उरूस सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम सभांना बंदी आणली आहे. त्यामुळे आज (बुधवार) होणारा उरूस रद्द करण्यात आला आहे. तसेच येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

हेही वाचा - पोलिसांकडून मौलानांना कोरोना विषयी जनजागृतीचे आवाहन; एकत्र जमण्यावर मात्र चुप्पी

शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार मनमाड शहर पोलिसांनी यात्रेसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या नाकारल्या असुन ग्रामसेवक आणि सरपंच यांनाच पत्र देऊन या वर्षी यात्रा न भरविण्याचे आदेश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.