ETV Bharat / state

Nashik Chandan Theft : नाशिकमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यातून चंदनचोरी

author img

By

Published : Feb 19, 2022, 10:47 PM IST

नाशिकमध्ये चक्क पोलीस उप महानिरीक्षक यांच्या निवासस्थानातून ( Chandan Theft In AD. IG House ) चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

Nashik Chandan Theft
Nashik Chandan Theft

नाशिक - नाशिकमध्ये चक्क पोलीस उप महानिरीक्षक यांच्या निवासस्थानातून ( Chandan Theft In AD. IG House ) चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे चंदन चोरांनी पोलीस यंत्रणेला खुले आव्हान दिल्याची चर्चा पोलीस यंत्रणेत सुरू आहे.

सीसीटीव्ही फुटेज

चंदनाचे खोड कापून नेल्याचा प्रकार -

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलीस कर्मचारी अमोल बर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्या निवासस्थानी कर्तव्यास आहे. रात्री चोराने बंगल्याच्या आवारात प्रवेश करत समोर 20 वर्ष जुन्या चंदन वृक्षाचे खोड कटरने कापून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसऱ्या घटनेत सातपूर पोस्ट कार्यालयाच्या आवारातील चंदन वृक्षाची चोरी झाली आहे, याबाबत प्रमोद आहेर यांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाजवळून रविवारी 13 फेब्रुवारीला पाच चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी चोरली. खोड कापून नेल्याचा प्रकार सकाळी उघड झाल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांच्या निवासस्थानातून पाच हजारांच्या चंदनाच्या खोडाची चोरी झाली.

पोलीस पुष्पच्या मागावर -

पुष्पा चित्रपटाच्या कथनकाला शोभेल, अशा पद्धतीने चंदन चोरांनी थेट पोलीसांच्या घराच्या आवारात घुसून चोरी करत पोलिसांना आव्हान दिले आहे. याआधी देखील नाशिक शहरात जिल्हाधिकारी, न्यायाधीश, पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्याच्या आवारातून घुसून चोरांनी चंदन चोरी केली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या बंगल्याच्या आवारातून चंदन चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस चोरांचा शोध घेत आहे.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना नियंत्रणात; शनिवारी दीड हजार नवे बाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.