ETV Bharat / state

Chain snatcher Gramsevak : आरे बापरे..ग्रामसेवकच निघाला चेनस्नॅचर - Gramsevak

एका प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकाने ( Gramsevak) पाच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी (Gold chain) मंगळसूत्रे ओरबाडून पळविल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. विपुल रमेश पाटील असे त्या संशयित प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकाचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाखांचे दागिने हस्तगत (Five lakh jewelry seized) करण्यात आले आहेत

Chain snatcher Gramsevak
ग्रामसेवकच निघाला चेनस्नॅचर
author img

By

Published : Dec 18, 2021, 10:23 AM IST

Updated : Dec 18, 2021, 10:48 AM IST

नाशिक : नाशिक पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत चांदवड तालुक्यातील प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकच सोनसाखळी चोर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस मित्राने दिलेल्या माहितीवरून गंगापूर पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे.

ग्रामसेवक निघाला सोनसाखळी चोर

जागरूक नागरिक व पाेलिस मित्राच्या सतर्कतेमुळे या चोरास अटक करण्यात यश आल्याची माहिती पाेलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रियाज शेख यांनी चेनस्नॅचिंग राेखण्यासाठी हद्दीत पोलीस मित्र व नागरीकांचे पथक नेमले हाेते. त्यांना एका संशयिताचे व्हिडीओ फुटेज दाखवून वर्णनाबद्दल माहिती दिली होती. त्यानुसार या वर्णनाचा व्यक्ती पोलीस मित्राला दिसला. त्यांनी पोलीस नाईक राहुल सोळसे व सतिष जाधव यांना संपर्क करून सावरकर नगर परिसरात विना नंबर प्लेट माेपेडवर फिरणाऱ्या संशयिताची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून त्याला पकडले. चौकशी केली असता त्याने गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४ लाख ९४ हजार ८५९ रु किंमीच्या ११ तोळे वजनाच्या सोन्याच्या लगडी, २० हजार रूपये किंमतीची एक मोपेड दुचाकी असा एकूण ५ लाख १४ हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त अंबादास भुसारे, पाेलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या निर्देशाने गुन्हे शोध पथकाने केली आहे. विपूल पाटील याने कोरोनाकाळात १४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.ते फेडण्यासाठी चोरीचा मार्ग स्विकारला. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो चांदवडमध्ये प्रशिक्षणार्थी ग्रामसेवक म्हणून नोकरी करतो. अमृतधाम भागात राहणारा विपूल रविवारी आणि सुटीच्या दिवशी नाशिक शहरात महिल्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकवून लंपास करायचा.

Last Updated : Dec 18, 2021, 10:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.