ETV Bharat / state

मांजरपाडा प्रकल्प पूर्ण; गुजरातकडे जाणारे पाणी वळविण्याच्या छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश - येवला

महाराष्ट्रातील पश्चिमेकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. या बोगद्यातून पाणी वाहून पुणेगाव धरणात येण्यास सुरुवात झाली आहे. तर आज या पाण्याचे जलपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले.

मांजरपाडा प्रकल्प पूर्ण
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:34 PM IST

Updated : Jul 25, 2019, 8:47 PM IST

नाशिक - मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून आज या प्रकल्पाचे जलपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे वर्षानुवर्ष दुष्काळात होरपळणाऱ्या येवलासह निफाड,चांदवड, दिंडोरी आदी तालुक्याचे दुष्काळाचे चित्र बदलणार आहे.

मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्यातून वाहणाऱ्या पाण्याचे छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन

महाराष्ट्रातील पश्चिमेकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. या बोगद्यातून पाणी वाहून पुणेगाव धरणात येण्यास सुरुवात झाली आहे. तर आज या पाण्याचे जलपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले.

पश्चिम वाहिनी नदीचे पाणी अडवून ते वळण योजनेद्वारे पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रयत्न केला. त्यामुळे जलसंपदा विभागाने दिनांक २४ नोव्हेंबर २००६ ला मांजरपाडा या महत्त्वकांक्षी योजनेला मंजुरी दिली. पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी खोरे दुभाजक, रेषाच्या पश्चिम बाजूला वाहत जाणारे, छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडवणे, त्याचा सांडवा पूर्व बाजूला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्ण बाजूला गोदावरी खोऱ्यात वळवणे, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.

गुजरातसह समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात पूर्वेकडे वळविणारी ही राज्यातील पहिली योजना आहे. मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाने गावाच्या खालील बाजूस पाणी अडवून हे पाणी बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस, ऊनंदा नदीत सोडण्यात आले आहे. या योजनेद्वारे ६०६ दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त स्थानिक वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.

या प्रकल्पांमधील मांजरपाडा धरणाची एकूण लांबी ३ हजार ४५० मीटर इतकी आहे. तर समुद्र सपाटीपासून धरण माथा पातळी ७२२ मीटर व पूर्णसंचय पातळी ७१८ मीटर आहे. धरणाच्या लांबीत एकूण १२ नाले अडवण्यात आले आहे. एकूण १०.१६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे पुढे हे पाणी उनंदा नदीतील ३.२० किलोमीटर लांबीच्या उघड्या चाऱ्याद्वारे गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे.
मांजरपाडा वळण योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, निफाड, येवला या तालुक्यांना पाणी उपलब्ध होणार आहे, यामुळे येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या जवळच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

मांजरपाडा योजनेची वैशिष्ट्ये

१. गुजरात समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणारा राज्यातील पहिला प्रकल्प
२. ३ हजार ४५० मीटर लांबीचे धरण
३. १०.१६ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी महाराष्ट्रात आणले
४. येवलासह निफाड, दिंडोरी, चांदवड आदी क्षेत्र सिंचनाखाली येणार
५. योजनेची किंमत ३२८. ४५ कोटी

भुजबळांचा महत्वकांक्षी असलेला मांजरपाडा प्रकल्प हा ऑक्टोबर २०१४ पासून रखडला होता. भुजबळ पालकमंत्री असताना त्यासाठी त्यांनी निधी, सर्व तरतुदी व मान्यता पूर्ण केल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने या प्रकल्पाचा ७० कोटी निधी इतरत्र वळवला होता. मात्र, भुजबळांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यांनी या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागात बैठका घेतल्या, मांजरपाडा प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर आता हा प्रकल्प पूर्णत्वास आला. सध्या ९ किलोमीटर बोगद्याचे काम बुधवारी पूर्ण झाले आहे. तर उरलेल्या बोगद्याचे काम ३१ जानेवारीपर्यंत आणि सांडव्याचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे येवला चांदवडसह मनमाडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Intro:छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश, मांजरपाडा प्रकल्प पूर्ण..

Body:माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळांचे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले,आज या प्रकल्पाचे जलपुजन छगन भुजबळ यांच्या हस्ते झालं...या प्रकल्पामुळे वर्षेनुवर्ष दुष्काळात होरपळणाऱ्या येवला सह निफाड,चांदवड,दिंडोरी आदी तालुक्याचं दुष्काळाचे चित्र बदलणार आहे..

महाराष्ट्रातील पश्चिमेकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून बोगद्यातून पाणी वाहून पुणेगाव धरणांत येण्यास सुरुवात झाली आहे, या पाण्याचे जलपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालं.,या प्रकल्पामुळे वर्षानुवर्षे दुष्काळामध्ये असलेला येवला ,चांदवड ,दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या प्रकल्पामुळे जलसंजीवनी मिळणार आहे,

पश्चिम वाहिनी नदीचे पाणी अडवून ते वळण योजनेद्वारे पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे जलसंपदा विभागाने दिनांक 24 नोव्हेंबर 2006 ला मांजरपाडा या महत्त्व योजनेला मंजुरी दिली, पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनी खोरे दुभाजक, रेषाच्या पश्चिम बाजूला वाहत जाणारे, छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडवणे, त्याचा सांडवा पूर्व बाजूला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्ण बाजूला गोदावरी खोऱ्यात वळवणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे ...

गुजरातसह समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात पूर्वेकडे वाढवणारी ही राज्यातील पहिली योजना आहे, मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाने गावाच्या खालील बाजूस पाणी अडवून हे पाणी बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस, ऊनंदा नदीत सोडण्यात आले आहे, या योजनेद्वारे 606 दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे, या व्यतिरिक्त स्थानिक वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे...

या प्रकल्पांमधील मांजरपाडा धरणाची एकूण लांबी 3450 मीटर इतकी असून समुद्र सपाटीपासून धरणमाथा पातळी 722 मीटर व पूर्णसंचय पातळी 718 मीटर आहे, धरणाच्या एकूण लांबीत एकूण 12 नाले अडवण्यात आले आहे,एकूण 10.16 किलोमीटर लांबीच्या बोगद्या द्वारे पुढे उंनदा नदीतील 3.20 किलो मीटर लांबीच्या उघड्या चाऱ्या द्वारे गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे...
मांजरपाडा वळण योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, निफाड ,येवला या तालुक्यांना पाणी उपलब्ध होणार असून ,येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे, त्याचबरोबर सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे या प्रकल्पाच्या जवळच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे

मांजरपाडा योजनेचे वैशिष्ट् ..
- गुजरात समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणार राज्यातील पहिला प्रकल्प..
- 3450 मीटर लांबीचे धरण
-10.16 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी महाराष्ट्रात आणले.
- येवला सह निफाड, दिंडोरी ,चांदवड आदी क्षेत्र सिंचना खाली येणार..
-योजनेची किंमत 328.45 कोटी

कपिल भास्कर चौपाल...नागरिक

इतकी आहे सन 2014 पर्यंत आघाडी सरकारच्या काळांमध्ये याबद्दलची काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले उद्या वेळोवेळी मंजुरी आलेल्या निधी खर्च आला आघाडी सरकारच्या काळात मान्यता दिल्यामुळे

2014 पासून हा प्रकल्प अनेक अडचणी मध्ये अडकला होता, मात्र त्याचा योग्य पाठपुरावा करत भुजबळांनी अशक्य काम शक्य करून दाखवले आहे ,आणि त्यामुळे येवला तालुक्या सह पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे...

सध्या भाजप शिवसेनेची सत्ता असतानाही भुजबळांनी पाठपुरावा करून नऊ किलोमीटर बोगद्याचचेआहे काम काल पूर्ण झाले, यापूर्वी धरणाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे ,
बोगद्याचे पूर्ण काम 31 जानेवारीपर्यंत तर सांडव्याचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे...

भुजबळांचा महत्वकांक्षी असलेला मांजरपाडा प्रकल्प हा ऑक्टोबर 2014 पासून रखडला होता,भुजबळ पालकमंत्री असतांना त्यांनी त्यासाठी निधी सर्व तरतुदी व मान्यता पूर्ण केल्या होत्या, मात्रल राज्य सरकारने या प्रकल्पाचा 70 कोटी निधी इतरत्र वळवला होता त्यानंतर त्यांनी या कारवाईनंतर तुरुंगातूनही प्रकल्पासाठी नियंत्रणाकडे पाठपुरावा केल्यावर या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देता जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागात बैठका घेतल्या मांजरपाडा प्रकल्प या कामाची पहाणी केली यानंतर आता हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानं येवला चांदवड सह मनमाडच्या पिण्याचा पाणी मार्गी लागणार आहे प्रकल्प कसा आहे या प्रकल्पात बोगदयाची लांबी 8.9 शे साठ किलोमीटर बांधण्याची क्षमता आहे 267 दशलक्ष घनफूट मांजरपाडा प्रकल्पाची क्षमता 600 दशलक्ष घनफूट बोगद्यातून पडणारा पाणी क्षमता 243

Conclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.