ETV Bharat / state

केंद्र सरकारने खतांवर तातडीने सबसिडी द्यावी; कृषिमंत्री दादा भुसेंची मागणी - नाशिक दादा भुसे बातमी

कोरोना काळामध्ये शेतमालाचे होणारे नुकसान त्यापाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांसाठी लागणारे रसायन महाग झाल्याने खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खतांवर तातडीने सबसिडी द्यावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

dada bhuse latest news
केंद्र सरकारने खतांवर तातडीने सबसिडी द्यावी; कृषिमंत्री दादा भुसेंची मागणी
author img

By

Published : May 18, 2021, 5:35 PM IST

नाशिक - खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने केंद्र शासनाने खतांवर तातडीने सबसिडी द्यावी, तसेच मागील वर्षीच्या दराने शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

प्रतिक्रिया

या कारणामुळे खतांच्या किमती वाढ -

कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. कोरोना काळामध्ये शेतमालाचे होणारे नुकसान त्यापाठोपाठ आस्मानी संकट आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारात खतांसाठी लागणारे रसायन महाग झाल्याने खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे बळीराजाचे कंबरडे पुन्हा एकदा मोडले असल्याने आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खतांवर तातडीने सबसिडी द्यावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

मागील वर्षीच्या दरानेच खत उपलब्ध करून द्यावी -

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसंर्गाने थैमान घातले आहे. याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला असून शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आले आहेत. यातच आता खतांच्या किमतीत 600 ते 700 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले. यामुळे खतांच्या किमती मागील वर्षी इतक्याच ठेवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी देखील मागणी दादा भुसे यांनी केली आहे.

हेही वाचा - कुस्तीपटू सागर राणा हत्या प्रकरण: सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून १ लाखांचे बक्षिस जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.