नाशिक - नाशिक रोड कारागृहातून बाहेर आलेल्या आठ आरोपीचे स्वागत करून त्यांची मिरवणूक काढणाऱ्या व फटाके फोडणाऱ्या 17 संशयीतांना नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या नऊ दुचाकी गाड्या व एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा - भंगार व्यावसायिकाच्या खूनाचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी जल्लोश करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक
पाच वर्षांपूर्वी रोकडोबा वाडी येथे खुनाचा प्रकार घडला होता. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. संबंधित आरोपी हे कारागृहातून सुटल्यानंतर त्यांची मिरवणूक काढून फटाके फोडून स्वागत करणार होते. त्यांच्यासाठी विहित गाव येथील बागुल नगर मध्ये चौफुलीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. या कार्यकर्त्यांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत होती. पोलिसांना प्रकार समजताच घटनास्थळी धाव घेतली. कोरोना महामारीमुळे जमाबंदी असतानाही कार्यकर्ते जमल्याने पोलिसांनी जल्लोश करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली व पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले असता कार्यकर्ते पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी चारी बाजूने घेरून त्यांना अटक केली आहे. नाशिक रोड परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - पाथरीत 4 लाख 80 हजाराचा गुटका जप्त; एकास अटक
कोरोनाचे नियम न पाळल्याने कारवाई
नाशिकरोड भागातील विहितगाव चौफुलीवर कारागृहातून सुटणाऱ्या आठ आरोपींचा जल्लोष करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. रस्त्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांना त्यामुळे अडथळा निर्माण होत होता. फटाके वाजवून जल्लोष देखील केला जात होता. त्याचबरोबर या युवकांनी रस्त्यावरच आपली वाहने उभी करून वाहतुकीस मज्जाव केला होता. त्यातच कोरोनाबाबतचे कुठलेही नियम त्यांच्याकडून पाळले जात नव्हते. पोलिसांनी कारवाई करत 17 जणांना ताब्यात घेतले आहे. तर त्याच्याजवळील 10 वाहने देखील पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त विजय खरात यांनी दिली आहे.