ETV Bharat / state

Sambhaji Bhide Case : संभाजी भिडे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. - मंत्री छगन भुजबळ

महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभर तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकारानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताप व्यक्त करून भिडे यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले. तर आता नाशिकरोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhaji Bhide Case
संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Aug 2, 2023, 5:50 PM IST

नाशिक : अमरावती येथील एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. दरम्यान नाशिकरोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरचा प्रकार अमरावती येथे घडला असल्याने हा गुन्हा अमरावती पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याचे, नाशिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

संभाजी भिडे यांचे वक्तव्य काय : संभाजी भिडे हे अमरावतीत असताना बोलले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधी यांच्या चारित्र्यावरच त्यांनी शिंतोडे उडवले होते. त्यामुळे राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

संभाजी भिडेंवर कारवाई झाली पाहिजे : संभाजी भिडेंवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे त्याशिवाय हे सरळ होणार नाहीत. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, बहुजन समाजाचेच काही लोक मनोहर भिडेच्या मागे संभाजी भिडे असे करत फिरत आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे दुर्दैवी आहे. राज्यात आणि देशात अशा प्रकारे वातावरण गढूळ करणारे हे जे प्रकरण आहे हे थांबले पाहिजे. कोणीही त्यांना पाठिशी घालता कामा नये असे मंत्री छगन भुजबळ यांनीही दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये म्हटले होते.

राष्ट्रपुरुषांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही : मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याबाबत अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशी करत आहेत. मात्र कोणीही कोणत्याही राष्ट्रपुरुषांची केलेली बदनामी खपवून घेतली जाणार नाही. मग ती सावरकरांची असो की महात्मा गांधींची असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

हेही वाचा -

  1. Fadnavis On Bhide : भिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात स्पष्टोक्ती
  2. Chhagan Bhujbal Reaction : भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - छगन भुजबळ
  3. MIM On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचा पाय कापणाऱ्यास दोन लाख; एमआयएम नेत्याकडून बक्षीस जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.