ETV Bharat / state

Extortion Case : आमदाराच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक माईनकर विरोधात खंडणीचा गुन्हा - पोलीस निरीक्षक निलेश माईनकर

नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे पोलीस दलासह शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Extortion Case
Extortion Case
author img

By

Published : May 6, 2023, 8:40 PM IST

नाशिक : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार सुहास द्वारकानाथ कांदे (४५, धांडा समाजसेवा, रा. पार्श्व बंगला, पाइपलाइन रोड, आनंदवली, नाशिक) हे नाशिक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असताना गंगापूर पोलीस ठाण्यात एका महिलेने काही इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.10 नोव्हेंबर 2016 रोजी दाखल केला. कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माईनकर याने गुन्ह्यातील आरोपींना धाक दाखवून मला या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली आहे.

अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर : अटक टाळण्यासाठी मी योग्य कायदेशीर मार्ग स्वीकारत होतो. या गुन्ह्याशी माझा कोणताही वैयक्तिक संबंध नसतानाही पोलीस निरीक्षक माईणकर यांनी मला या गुन्ह्याच्या तपासासाठी 23 डिसेंबर 2016 रोजी हजर राहण्यास सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यात अटक होऊन माझी राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ नये म्हणून मी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर तपास अधिकारी माईणकर यांच्या म्हणण्यानुसार मी तपासी अधिकाऱ्यासमोर हजर होऊन माझा जबाब दिल्याचेही कांदे यांनी सांगितले.

चार लाखांची मागितली खंडणी : माईनकर याने मला धमकावून ब्लॅकमेल करून माझ्याकडे चार लाख रुपयांची मागणी केली. तसेच तत्कालीन पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच माईनकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी 9 जानेवारी 2017 रोजी मुख्यमंत्री गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे अर्ज केल्याचे कांदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.मात्र वेगवेगळ्या विभागाकडे तक्रारी करूनही तोच तपास अधिकारी असल्याने वेळोवेळी ‘तू माझ्याविरुद्ध तक्रार केलीस तर मी तुला गुन्ह्यात अडकवून टाकेन’, अशी धमकी देऊन माझ्यावर बेकायदेशीर रक्कम मागण्यासाठी दबाव आणला. .

माईणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल : या प्रकरणात उच्च न्यायालयाने सर्व गोष्टींची पडताळणी करून कांदे यांची निर्दोष मुक्तता केली. उच्च न्यायालयातून न्याय मिळाल्यानंतर कांदे यांनी माईनकर यांच्याविरुद्ध सी. R. P. C. कलम 156 (3) अंतर्गत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात माईणकर यांच्याविरुद्ध दि. डी. वि. कलम 384, 385 आणि 389 तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 13 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ करीत आहेत.

नियंत्रण कक्षात बदली : नीलेश माईणकर यांना 1 मे महाराष्ट्र दिनी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पदक मिळाले. त्यानंतर त्यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आले

  • हेही वाचा -
  1. RSS VHP Bajrang Dal : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा काय आहे संबंध?
  2. Lover Refused Marriage : कहरच! लग्नाच्या दिवशीच प्रियकर नॉट रिचेबल; प्रेयसी पोहचली थेट पोलीस ठाण्यात
  3. Video: बहिणीच्या विनयभंगाला भावाने केला विरोध, गुंडांनी बांधून केली मारहाण;व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.