ETV Bharat / state

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात फोडले फटाके, गुन्हा दाखल

तब्बल दहा महिन्यानंतर चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहेत. नवीन चित्रपट रिलीज होत नसल्याने चित्रपटगृहात जुने चित्रपट दाखवण्यात येत आहेत.

firecrackers in central film Theater Malegaon
मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात फोडले फटाके
author img

By

Published : Feb 24, 2021, 3:22 PM IST

Updated : Feb 24, 2021, 6:39 PM IST

मालेगाव - मालेगावातील सेंट्रल चित्रपट गृहात 'करण अर्जुन' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. हा शो सुरू असतांना शाहरुख आणि सलमानची एंट्री होताच काही चाहत्यांनी चित्रपट गृहात फाटके फोडण्यास सुरवात केली. त्यामुळे चित्रपट गृहात एकाच गोंधळ उडाला. या संदर्भात चित्रपट गृहाच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून मालेगावच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने चित्रपट गृह पूर्ववत सुरू झाले. मात्र नवीन चित्रपटाची निर्मिती नसल्याने मालेगाव मधील सेंट्रल चित्रपट गृहात जुने चित्रपट प्रदर्शित होतं आहे. अशात 'करण अर्जुन' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या शो दरम्यान शाहरुख आणि सलमानची एंट्री होताच काही तरुण चाहत्यांनी चित्रपट गृहात एकचं गोंधळ करत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली. यामुळे चित्रपटगृहात धावपळ उडाली. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा हा प्रकार तब्बल 15 मिनिटं सुरू होता. अशात काही प्रेक्षकांनी0 हा प्रकार मोबाइल मध्ये कैद करत हा व्हिडीओ व्हायरल केला.

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात फोडले फटाके
पोलिसात गुन्हा दाखल-

पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशानतंर सेंट्रल चित्रपट गृहाचे व्यवस्थापक मोहम्मद सुलेमान यांच्या तक्रारी वरून अज्ञात संशयित व्यक्तींच्या विरोधात कलम 286 अंतर्गत व महाराष्ट्र पोलीस कायदा 112,117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 वर्षात 27 वी घटना-

मालेगावमध्ये चित्रपट गृहात फटाके फोडण्याच्या घटना नवीन नसून याआधी देखील अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. पूर्वी धर्मेंद्र आणि मिथून चक्रवर्ती याचे अनेक चाहते होते. तेव्हा चित्रपट गृहात हुल्लडबाजी करत चिल्लर उडवण्याचा ट्रेंड होता. आता सलमान, शाहरुख आणि अमीर खान चे चाहते वाढले असून त्यांनी चित्रपट गृहात फटाके फोडण्याचा ट्रेंड सुरू केला. यामुळे चित्रपट मालक मात्र कायम दहशती खाली असतात.

दुर्घटना होण्याची दाट शक्यता-

चित्रपट गृहात शो सुरू असताना काही समाजकंटक अचानक फटाक्यांची आतिषबाजी करत हुल्लडबाजी करतात. त्यामुळे शांततेत चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांची धावपळ होते. अशात चित्रपट गृहात मोठी गर्दी आल्याने चेंगराचेंगरीची घटना देखील होण्याची शक्यता असते. तसेच मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने चित्रपट गृहाला आग लागून मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा- सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलले, आता नरेंद्र मोदी स्टेडियम हे नवे नाव

Last Updated : Feb 24, 2021, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.