ETV Bharat / state

मालेगावच्या माजी आमदारावर गुन्हा; नियमांना तिलांजली देत घेतली होती जाहीर सभा - माजी आमदार आसिफ शेख गुन्हा दाखल

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी शासकीय नियमांना केराची टोपली दाखवत मालेगावच्या रौनकाबाद भागामध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये शक्तिप्रदर्शन करण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन केले गेले नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Mar 6, 2021, 3:41 PM IST

Updated : Mar 6, 2021, 4:33 PM IST

नाशिक - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर सभा घेणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई असताना मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आडमुठेपणा दाखवित राजकीय शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी जाहीर सभा घेतली, विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली असताना शेख यांनी सभा घेतली. या प्रकरणी असिफ शेख यांच्यासह आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक

शेख यांनी शासकीय नियमांना केराची टोपली दाखवत मालेगावच्या रौनकाबाद भागामध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये शक्तिप्रदर्शन करण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन केले गेले नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले. यात कोरोनाचे नियम या सभेदरम्यान अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आले होते. यातील धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील माजी आमदार शेख यांनी ही सभा घेतली. यामुळे असिफ शेख यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शनिवारी कोरोना आणि जमावबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालेगावमध्ये आसिफ शेख आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश?

काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आपली राजकीय वाटचाल ठरवण्यासाठी आसिफ शेख यांनी या सभेचे आयोजन केले होते. आपल्या अटी मान्य झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रवेश घेणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी या सभेदरम्यान केले. मात्र, या सभेला हजारो लोकांची गर्दी जमवत सुरक्षित अंतर राखणे आणि कोरोना नियमांना त्यांनी तिलांजली दिल्याने संपूर्ण मालेगावात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह आयोजकांवर अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

हेही वाचा - विनामास्क फिरणाऱ्या राज ठाकरेंवर सर्वच राजकीय नेत्यांकडून टीका

हेही वाचा - नाशिक : राज ठाकरेंच्या दौऱ्यात चोरीचा प्रकार; पाकिटमाराला कार्यकर्त्यांनी दिला चोप

हेही वाचा - आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पंचवटी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Last Updated : Mar 6, 2021, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.