ETV Bharat / state

आमदारकीच्या वर्षपूर्तीला तलवारीने कापला केक, आमदार मुफ्तीसह दहा जणांविरोधात गुन्हा - nashik breaking news

आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त मालेगाव येथील एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी सार्वजनीक ठिकाणी तलवारीने केक कापल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार मुफ्ती इस्माईलसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आमदार मुफ्ती
आमदार मुफ्ती
author img

By

Published : Oct 27, 2020, 10:35 PM IST

नाशिक - आमदारकीला एक वर्ष झाल्याने सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून जल्लोष केल्याप्रकरणी मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह इतर दहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी सोमवारी (दि. 26 ऑक्टोबर) सार्वजनिक ठिकाणी केक कापून जल्लोष साजरा केला. मुफ्ती इस्माईल हे एमआयएम पक्षाचे मालेगाव येथील आमदार आहेत. मालेगावच्या एका सार्वजनिक ठिकाणी त्यांनी वर्षपूर्तीचा आनंदोत्सव साजरा करत तलवारीने केक कापला होता.

दरम्यान, याप्रकरणी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह इतर दहा जणांविरोधात मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू आहे. मात्र, या ठिकाणी जल्लोष साजरा करत असताना मुफ्ती इस्माईल त्यांच्या समर्थकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे बघायला मिळाले.

हेही वाचा - स्मार्ट सिटी विभागात अनागोंदी कारभार; शिवसेना नगरसेवक करणार मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.