ETV Bharat / state

नाशिक : विवाह सोहळ्याला 100 नागरीकांची मर्यादा रद्द करा; केटरिंग असोसिएशची मागणी

प्रशासनाच्यावतीने लग्नासाठी केवळ 100 नागरीकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी रद्द करून हॉल किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के इतक्या नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केटरिंग असोसिएशने केली आहे.

cancel-limit-of-hundred-citizens-for-wedding-ceremony
नाशिक : विवाह सोहळ्याला 100 नागरीकांची मर्यादा रद्द करा; केटरिंग असोसिएशची मागणी
author img

By

Published : Mar 7, 2021, 6:55 PM IST

नाशिक - विवाह सोहळ्याला 100 नागरीकांची मर्यादा रद्द करून हॉल किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के इतक्या नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा नाशिक केटरिंग असोसिएशने पत्रकार परिषदेत दिला. तसेच यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

हॉल क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्या -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून विवाह सोहळ्यावर शासनाने निर्बंध घातले. परिणामी लग्न सोहळ्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायासह केटरिंग व्यवसाय संकटात सापडला आहे. मागील वर्षभरात शहर व जिल्ह्यातील केटरिंग व्यवसायिकांचे 100 ते 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत भर पडत आहे. अनेकांनी केटरिंग व्यवसाय बंद केले आहेत. प्रशासनाच्यावतीने लग्नासाठी केवळ 100 नागरीकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यातही 100 नागरिक ठरवितांना नियमांचे स्पष्टीकरण नसल्याने अडचणी अधिकच भर पडत असल्याचे व्यवसायिकांचे म्हणणे आहे. पुढील 15 दिवसात शासनाने विवाह सोहळ्यावरील निर्बंधांबाबत शिथिलता आणली नाही आणि हॉल क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही, तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा नाशिक कॅटरिंग असोसिएशने दिला आहे.

आमच्यावरच अन्याय का? -

कोरोनामुळे मागील वर्षी मार्च महिन्यापासून आमचा केटरिंग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जानेवारी 2021 नंतर कुठे तरी व्यवसाय चांगला सुरू असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लग्न सोहळ्यावर बंधने घालण्यात आली. मागील वर्षभरात नाशिक जिल्ह्यात केटरिंग व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील सर्व हॉटेल, बार, वाइन शॉप, एक्सिबिशनवर कुठलेच निर्बंध नाही, फक्त लग्न सोहळ्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे आमच्यावरच अन्याय का, असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

कामगारांवर उपासमारीची वेळ -

केटरिंग व्यवसायाची अतिशय बिकट परिस्थिती झाली असून यावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभरात केटरिंग व्यवसायाला करोडो रुपयांचे नुकसान झाले असून सरकारने लवकरात लवकर यावर ती तोडगा काढून लग्नसमारंभासाठी उपलब्ध जागेच्या 50 टक्के नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम गाढवे यांनी केली आहे.

हेही वाचा - अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांची आयकर विभागाकडून पुण्यातील हॉटेलमध्ये चौकशी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.