ETV Bharat / state

Businessman Kidnapping in Nashik : नामांकित व्यावसायिकाचं घराबाहेरुन अपहरण; नाशकात खळबळ - Hemant Parakh nashik

Businessman Kidnapping in Nashik : नाशिकमध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख (Hemant Parakh) यांचे शनिवारी (2 सप्टेंबर) रात्री अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik kidnapping News
नामांकित व्यावसायिकाचे अपहरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 12:27 PM IST

पारख यांच्या घराबाहेरील व्हिडिओ

नाशिक : Businessman Kidnapping In Nashik : नाशिक शहरात एका नामांकित बांधकाम साहित्य वितरक व्यवसायिकाचे इंदिरानगर भागातून अपहरण (Businessman Kidnapping ) झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Nashik Crime News) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. व्यावसायिकाच्या (Hemant Parakh Kidnapping) शोधासाठी पोलीस पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

हेमंत पारख यांचं घराबाहेरून अपहरण : मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरात राहणारे 'गजरा ग्रुप'चे चेअरमन हेमंत पारख (Gajra Group Chairman Hemant Parakh) हे त्यांच्या घराबाहेर उभे असताना, त्यांना शस्त्राचा धाक दाखवत बळजबरीने कारमध्ये कोंबून अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच व्यावसायिकाच्या कुटुंबांशी संवाद साधण्यात आला आहे. तपासाला गती देत परिसरातील सीसीटीव्ही तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारख यांच्या घराजवळील रस्त्यावरील सर्व सीसीटीव्हीची तपासणी केली आहे.

पोलिसांसमोर आव्हान : नाशिक शहरात गेल्या महिन्याभरापासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अशातच शहरातून बड्या व्यावसायिकाचे अपहरण झाल्याने पोलीस यंत्रणेला थेट गुन्हेगारांनी आव्हान दिल्याचं बोलले जात आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत असताना आता थेट खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण झाल्याने पोलिसांसमोर हा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान आहे. खंडणीसाठी हे अपहरण झाल्याचं सांगितलं जात आहे.

जागेच्या वादातून अपहरणाचा संशय : हेमंत पारख यांचं जागेच्या वादातून खंडणीसाठी अपहरण झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता पारख यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांचीच माहिती घेतली जात आहे. घटनेच्या वेळेस सुरुवातीला एका बुलेटवरून एक जण रेकी करून गेला होता. पारख हे घराबाहेर उभे होते. त्यानंतर नंबर प्लेट नसलेल्या दोन कार आल्या आणि शस्त्राचा धाक दाखवून पारख यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबत घेऊन गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. Businessman Kidnapping : शेअरमध्ये गुंतविले 4 कोटी अन मागतोय 20 कोटी; व्यावसायिकाचे अपहरण
  2. बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या तिघांना सांगली पोलिसांकडून अटक
  3. Sangli Murder Case अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा खून करून मृतदेह फेकला नदीपात्रात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.