ETV Bharat / state

पेठ येथील उमराळेजवळ एसटी बसला अपघात, ५०हून अधिक प्रवाशी बचावले

उमराळे गावानजीक पोहोचल्यानंतर अचानक एक दुचाकीस्वार बससमोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाकडून बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली.

नाशिक पेठ उमराळेजवळ एसटी बसला अपघात
author img

By

Published : Nov 7, 2019, 8:09 PM IST

नाशिक - पेठ-जळगाव बसला उमराळे नजीक अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात घुसली. या अपघातात ५०हून अधिक प्रवाशी होते. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना प्राथमिक उपचार करून मार्गस्थ करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पेठ आगारची एमएच १४ बीटी ३६२७ क्रमांकाची बस सकाळी आगारातून निघाली. पेठ तालुक्यातील उमराळे गावानजीक पोहोचल्यानंतर अचानक एक दुचाकीस्वार बससमोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाकडून बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली. या बसमध्ये ५०हून अधिक प्रवासी होते. अचानक रस्त्याच्या कडेला बस उतरल्याने बेसावध असलेल्या प्रवाशांच्या डोक्याला, हाताला किरकोळ दुखापत झाली. बस चालकाने स्थानिकांच्या मारहाणीपासून वाचवण्यासाठी अपघात स्थळावरून पळ काढला. दरम्यान संतप्त झालेल्या जमावाने राग अनावर झाल्यामुळे बसवर दगडफेक केली. या अपघातात किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचार करून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले.

Intro:पेठ येथील उमराळे जवळ एसटी बसला अपघात, 50 हुन अधिक प्रवासी बचावले....

Body:पेठ -जळगाव बसला उमराळे नजीक अपघात झाला, चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला एका चारीत घुसली,सुदैवाने या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचार करून या प्रवाशांना मार्गस्थ करण्यात आलं...

मिळालेल्या माहितीनुसार पेठ आगारची एमएच 14 बीटी 3627 क्रमांकाची बस सकाळी आगारातून निघाली असता, पेठ तालुक्यातील उमराळे गावानजीक पोहोचली असता, अचानक एक दुचाकीस्वार बस समोर आला असता, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाकडून,बस वरील नियंत्रण सुटले, यामुळे बस रस्त्या शेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली,या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते, अचानक रस्त्याच्या कडेला बस उतरल्याने बेसावध असलेल्या प्रवाशांच्या डोक्याला, हाताला किरकोळ दुखापत झाली बस चालकाने स्थानिकांच्या मारहाणीपासून वाचवण्यासाठी अपघात स्थळापासून पळ काढला,दरम्यान संतप्त झालेल्या जमावाने राग अनावर झाल्यामुळे बसवर दगडफेक केली,या अपघातात किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचार करून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आलं..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.