ETV Bharat / state

नाशिकमधील चणकापूर धरणाजवळील पुलाचा भाग कोसळला - नाशिक पुल कोसळला

कळवण तालुक्यातल्या चणकापूर धरणाजवळ असलेल्या पुलाचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे. २०१३ साली  म्हणजेच अवघ्या ६ वर्षांपूर्वी पुलाचे काम झाले होते. ६ वर्षातच पुलाचा एक भाग ढासळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नाशिकमधील चणकापुर धरणाजवळील पुलाचा भाग कोसळला
author img

By

Published : Aug 6, 2019, 3:28 PM IST

नाशिक - कळवण तालुक्यातल्या चणकापूर धरणाजवळ असलेल्या पुलाचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा पूल पाण्याखाली होता. आज (मंगळवार) सकाळी पुलावरील पाणी ओसरताच पुलाचा काही भाग कोसळल्याचे ते स्थानिकांनी निदर्शनास आणले.

नाशिकमधील चणकापुर धरणाजवळील पुलाचा भाग कोसळला

चणकापूर धरणातून गेल्या ४ ते ५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रविवारी १७ हजार क्युसेक पाणी तर सोमवारी ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला. ज्या ठिकाणाहून पाणी पुढे जाते त्या चणकापूर धरणाच्या नदीवर कनाशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा पूल आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चणकापूरच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. म्हणुन पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद होती.

आज सकाळी पुलावरील पाणी ओसरल्यानंतर या पुलाचा काही भाग कोसळल्याचे लक्षात आले. २०१३ साली म्हणजेच अवघ्या ६ वर्षांपूर्वी पुलाचे काम झाले होते. ६ वर्षातच पुलाचा एक भाग ढासळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, कळवण तालुक्यातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली असून लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे तालुक्यात रस्त्यांची कामे दर्जाहीन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Intro:नाशिक -कळवण तालुक्यातल्या चणकापुर धरणाजवळ असलेला पुलाचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे.गेल्या दोन दिवसांपासुन हा पुल पाण्याखाली होता.आज सकाळी पुलावरील पाणी ओसरताच ह्या पुलाचा काही भाग कोसळल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले.Body:चणकापुर धरणातुन गेल्या चार ते पाच दिवसापासुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.रविवारी 17 हजार क्युसेक पाणी तर सोमवारी 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता.ज्या ठिकाणाहुन हे पाणी पुढे जाते त्या चणकापुर धरणाच्या समोर असलेल्या नदीवर कनाशी कडे जाणाऱ्या रस्त्यावर हा पुल आहे.दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चणकापुरच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातयं म्हणुन पुल दोन दिवसांपासुन पाण्याखाली गेल्याने येथील वाहतुक ही बंद होतीConclusion:आज सकाळी पाऊस कमी झाल्याने पुलावरील पाणी ओसरल्यानंतर ह्या पुलाचा काही भाग कोसळल्याचे लक्षात आले.2013 साली या म्हणजेच अवघ्या सहा वर्षापुर्वी या पुलाचे काम झाले होते.सहा वर्षातच पुलाचा एक भाग ढासळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान,कळवण तालुक्यातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली असुन लोकप्रतिनिधी,ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगत मुळे तालुक्यात रस्त्यांची कामे दर्जाहीन असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.