ETV Bharat / state

Border Security Force : सीमा सुरक्षा दलातील जवान गायत्री जाधव यांचा मृत्यू - सीमा सुरक्षा दल

निफाड तालुक्यातील पहिली सीमा सुरक्षा दलातील ( Border Security Force ) जवान गायत्री जाधव यांचा मृत्यू झाला आहे. ( Death of Border Security Force constable Gayatri Jadhav ) त्यांना प्रशिक्षण घेतांना अपघात झाला होता.तेव्हापासून त्याच्यावर दोन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Gayatri Jadhav dies
Gayatri Jadhav dies
author img

By

Published : Nov 23, 2022, 5:22 PM IST

नाशिक - निफाड तालुक्यातील पहिली सीमा सुरक्षा दलातील ( Border Security Force ) जवान गायत्री जाधव यांचा मृत्यू झाला आहे. ( Death of Border Security Force constable Gayatri Jadhav ) बथनाहा जिल्हा अररिया बिहार येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणारी देवगाव (ता.निफाड) येथील कु.गायत्री विठ्ठल जाधव ( वय 23) हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रशिक्षण घेत असताना तिचा खड्यात पडून अपघात झाला होता.

ट्रेनिंग सुरु असतांना मृत्यू - अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने गायत्रीने रोजंदारी करत देवगाव येथील भोसले विद्यालयात शिक्षण घेतले. लासलगाव नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन, त्यानंतर लासलगाव येथीलच पार्थ अकॅडमी येथे ट्रेनिंग झाल्यावर स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून गायत्रीची सीमा सुरक्षा दलात अलवर राजस्थान येथे ट्रेनिंगसाठी तिची निवड झाली.

मेंदूवर शास्रक्रिया - राजस्थानमध्ये ट्रेनिंग पूर्णत्वास जात असतांना तिचा खड्ड्यात पडून अपघात झाला होता. त्यानंतर तीची अलवर राजस्थान येथे मेंदूवर शास्रक्रिया करण्यात आली होती. बरे वाटल्यानंतर ती परत ट्रेनिंगला रुजू झाली होती. परत त्रास जाणवू लागल्याने एस एम एस हॉस्पिटल जयपूरला परत मेंदूवर शस्रक्रिया करण्यात आली. पुढे प्रकृतीत सुधारणा झाली ती पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर दि. 30 मार्च 22 रोजी एस एस बी बथनाहा जिल्हा अररिया बिहार येथे नेपाळ सीमेवर आपल्या कर्तव्यावर रुजू झाली.

मात्र रुजू झाल्यानंतर कर्तव्यावर असताना तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन घरी आली. नाशिक येथील दोन खाजगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर 1 जून रोजी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तीन महिने उपचार घेतल्यानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी एम्स दिल्ली येथे उपचारासाठी नेण्याची तयारी नातलग करीत होते. मात्र तिथे जाण्यापूर्वी दुपारी तिची तब्येत खूप खालावली. दृष्टी गेल्याने तातडीचा उपचार म्हणून ग्रामीण रुग्णालय, लासलगाव येथे तीला दाखल केले. मात्र तीचा दुर्दैवाने गायत्रीचा मृत्यू झाला आहे.

निफाड तालुक्यातील सैन्यात जाणारी पहिली मुलगी - गायत्री अत्यंत बुद्धिमान, जिद्दी असल्याने सैन्यात जाण्याचा तिचा माणस होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातुन सैन्यात जाणाऱ्या पहिल्या दोन मुलींमध्ये, निफाड तालुक्यात सैन्यात जाणारी ती पहिली तरुणी होती. गायत्रीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आई वडील मोलमजुरी करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.