नाशिक - अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ करण्यास भाग पाडत तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमधील जय भवानी रोड परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित त्याच्या भावाच्या तक्रारीनुसार बहिणीच्या मोबाइलवर सोशल मीडिया फ्रेंड लिस्टमधील संशयित अनमोल ठाकुर, भावना शाहू, बी के शाहू, प्रीती शर्मा, मुस्कान ठाकूर या नावाने अकाऊंट असलेले व्यक्ती आहे. शिवाय अनोळखी मोबाइल नंबरवरून एका व्यक्तीने अल्पवयीन बहिणीला फॅमिली पेन्शन नावाने मैत्रीची विनंती पाठवली. बहिणीला जाळ्यात ओढत अश्लील व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. तसेच संशयितांनी हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकारातील पीडित अल्पवयीन असून तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरू आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
'अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट प्रतिसाद देणे टाळा'
सोशल मीडियावर हॅकर महिला युवतीच्या नावाने अकाउंटवर इतर महिलांना फ्रेंड पाठवून चॅटिंग आणि कॉलवर मैत्री वाढवली जाते. घनिष्ठ मैत्री झाल्यानंतर समोरील व्यक्ती फोटो आणि व्हिडिओ कॉल करून भुरळ पाडतो. अशाप्रकारे कोणी फोटो आणि व्हिडिओ कॉल करण्यास सांगत असल्यास विरोध करावा. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -राख रस्त्यावर पडल्याने महिलेने चालकास चांगलेच धुतले