नाशिक - येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात दोन काळविटांची झुंज सध्या पाहायला मिळत असून हरिण सध्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरत आहे. डोंगराळ भागात वाळलेल्या गवतावर या दोन काळविटांची झुंज सुरू होती. मात्र, दोन मोकाट कुत्रे मागे लागल्याने झुंज सुटली व कुत्रे पकडतील म्हणून काळवीटांनी आपला जीव मुठीत धरून पळ काढला.
येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, कोळगाव, सोमठाणजोश आदी भागात हरणांचा वावर जास्त असल्याने वनविभागाने हरणांसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या वनक्षेत्रात जिकडेतिकडे वाळलेले गवत दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात हिरवे काहीच नसल्यामुळे हरिण व काळवीट अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरताना दिसत आहेत. त्यातच दोन काळविटांची झुंज सुरू असताना अचानक मोकाट कुत्रे मागे लागल्याने ही झुंज सुटली.