नाशिक - राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल, तर कठोर कारवाई करण्याची आदेश दिलेले आहेत. त्यामुळे इगतपुरीच काय तर राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. कुणीही कारवाईपासून वाचणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावाला राज्यपाल विरोध करणार नाहीत. राज्यपाल चांगले व्यक्ती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आगामी नागपूर अधिवेशनात आमदार निवासात कोविड सेंटर उभारले जाईल. त्यामुळे नागपूरचेच काही आमदार नागपूरमध्ये अधिवेशनाला विरोध करत आहेत. बिझनेस अॅडवायझरी कमिटी अधिवेशन कुठे घ्यायचे याचा निर्णय घेईल. तसेच राज्यात अन्नधान्याचा काळाबाजर करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा- जनता आपला अध्यक्ष निवडते, त्यांची इच्छा मान्य केली जाईल; अॅटर्नी जनरलने ट्रम्पना सुनावले
तथ्य असल्याशिवाय महापौर आरोप करणार नाहीत
नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. विविध माध्यमातून देखील याबाबत दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहे. याबाबत नाशिकच्या महापौरांनीच आता तक्रार केली आहे. खुद्द महापौरांनी तक्रार केली म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असून तथ्य असल्याशिवाय ते आरोप करणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर येथील आमदार निवासात कोविड सेंटर सुरू आहे. तसेच कोविडचे विलागीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागपूरला अधिवेशन नको, अशी मागणी आहे. त्यामुळे आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- दिवाळीसाठी एसटी सज्ज, जादा फेऱ्यांची घोषणा