नाशिक - एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येवल्यात पठाण यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन केले. यावेळी वारिस पठाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
देशविघातक वक्तव्य करणाऱ्या देशातील शांततेला व एकतेला बाधा उत्पन्न करणाऱ्या एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांचा निषेध करत त्यांच्यावर करावाई करावी, अशी मागणी यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
हेही वाचा - 'झटापटीत घडली लासलगाव जळीत घटना, गुन्ह्याच्या कलमात होणार वाढ'