ETV Bharat / state

येवल्यात भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी; आकारणी माफ करण्याची मागणी

महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने येवल्यात भारतीय जनता पक्षातर्फे महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. पक्षातर्फे येवल्यातील महावितरण कार्यालयासमोर वीजबिलांची होळी करण्यात येऊन राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

BJP protest in Yeola
येवल्यात भाजपच्या वतीने वीज बिलांची होळी
author img

By

Published : Nov 23, 2020, 4:42 PM IST

नाशिक - महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने येवल्यात भारतीय जनता पक्षातर्फे महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. पक्षातर्फे येवल्यातील महावितरण कार्यालयासमोर वीजबिलांची होळी करण्यात येऊन राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, पक्षातर्फे वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली.

माहिती देताना आंदोलक

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून जनतेचे संरक्षण व्हावे याकरीता देशभरात मार्चपासून लॉकडाऊन सुरू होता. या काळात घरगुती, व्यावसायिक व शेती विषयक वीजबिले भरमसाठ आलेली आहे. सद्यस्थितीत नागरिकांचे व्यवहार ठप्प झालेले असून सर्वच जनता आर्थिक विवंचनेत आहे. वाढलेली बिले माफ करण्यात यावी, किंवा विशिष्ट युनिटपर्यंत त्यात सूट देऊन जनतेचा आर्थिक भार हलका करावा, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा - नाशिकमध्ये पुन्हा लाॅकडाऊन, कर्फ्यूचीही अफवा; जिल्हा प्रशासन करणार कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.