नाशिक - शरद पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी 370 कलम परत लागू करावे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केले आहे. तसेच महायुतीची सत्ता पुन्हा येणार आणि भ्रष्टाचारी जेलमध्ये जाणार असेही किरीट सोमय्या यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे.
हेही वाचा - किरीट सोमय्यांची आमच्या प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत पाहा
फिर एक बार फडणवीस सरकार..असं म्हणत महायुतीच्या 233 वर जागा निवडून येतील, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. सत्ताधारी भाजप नेते फक्त 370 कलमावर बोलत असून इतर विकासाच्या मुद्यावर कोणी बोलत नाही, असे विरोधक म्हणत आहेत. यावर शरद पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी 370 कलम परत लागू करावे, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले.
हेही वाचा - २ वर्षानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्याचं ठिकाण येरवडा जेल असेल - सुजय विखे
70 वर्षानंतर हा कायदा रद्द झाला त्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. गेल्या 15 वर्षांत आघाडी सरकारने जेवढी कामे केली नाहीत तेवढी 5 वर्षांत युती सरकारने केली असून रस्ते, सिंचन तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याचे सोमय्या म्हणाले. विकास आणि राष्ट्रवाद डोळ्यासमोर ठेऊन लोक मोदीचें नेतृत्व आणि फडणवीस यांच्या कर्तुत्वाला मतदान करतील आणि युती सरकार 233 चा आकडा गाठेल, असा विश्वास सोमय्यांनी व्यक्त केला.
2014 मध्ये भाजप-सेना वेगळी लढली होती, त्यामुळे यंदा उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनेकांनी बंडखोरी केली असून त्याचा फारसा फरक पडणार नाही, काही बंडखोर जरी दिशाभूल करत असले तरी मतदार सुजाण असून मोठ्या मताधिक्याने युतीचे उमेदवार निवडून येतील असे, सोमय्या यांनी सांगितले.
हेही वाचा - माझ्या घरावर केलेला हल्ला हा तर शिवसेनेचा नामर्दपणा- हर्षवर्धन जाधव
मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेत की, महाराष्ट्र्र राज्य सहकारी बँकेचा पैसा बोगस बिडिंग करून लाटण्याचा आला, यात अजित पवार यांच्यासोबत अनेकांची नावे आहेत, अनेकांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. तसेच एका कंपनीचे एमडी रोहित पवार देखील आहेत. त्यांची देखील चौकशी होईल, असा धक्कादायक खुलासा किरीट सोमय्या यांनी केला.
2014 मधील निवडणुकीत लोकांनीं भ्रष्टाचाऱ्यांना घरी पाठवलं, मागील पाच वर्षात फडणवीस सरकारने जी स्वच्छ प्रतिमा ठेऊन महाराष्ट्र्रात काम केले, त्यामुळे मतदार यंदा देखील फडणवीस सरकारला संधी देतील आणि सर्व घोटाळेबाज एका पाठोपाठ एक जेलमध्ये जातील असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - धक्कादायक.. भाजपनंतर आता काँग्रेसचा 'टी शर्ट' घालून तरुणाची आत्महत्या