ETV Bharat / state

ठाकरे सरकारची मानसिकता तालिबानी, मंदिरं न उघडल्यास राज्यव्यापी आंदोलन - आचार्य भोसले - भाजप अध्यात्मिक विकास बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळांवर अवलंबून असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. सरकारने सोमवारपर्यंत मंदिरे उघडी नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा भाजप अध्यात्मिक विकास आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.

f
f
author img

By

Published : Aug 22, 2021, 3:11 PM IST

Updated : Aug 22, 2021, 3:20 PM IST

नाशिक - वारंवार विनवण्या करुनही मंदिरं उघडली जात नाहीत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो गरीबांचे दुःख या सरकारला समजत नाही. आमचे देव दीर्घकाळापर्यंत कडी-कुलपात बंदिस्त करुन ठेवले आहेत. मंदिरांवर लाखो नागरिक अवलंबून आहेत. या गरीबांचे दुःख सरकारला समजत नाही. ठाकरे सरकारची मानसिकता तालिबानी असल्याची जहरी टीका भाजप अध्यात्मिक विकास आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

बोलताना आचार्य भोसले

अन्यथा राज्यभर आंदोलन

ठाकरे सरकारने आपली तालिबानी मानसिकता बदलून सोमवारपर्यंत मंदिरे उघडली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सरकारला दिला आहे. राज्यातील मंदिरे हे कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली होती. पण, त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. वारंवार धर्मिक आघाडी तसेच साधू, महंत, वारकरी संप्रदाय सातत्याने मंदिरे उघडा, अशी मागणी करत आहेत. परंतु राज्य सरकार याबाबत कोणताही निर्णय घेण्यास तयार नसल्याचे भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा - दारू पिण्यासाठी बसायच्या जागेवरून वाद, एकाचा खून; आरोपीला अटक

Last Updated : Aug 22, 2021, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.