ETV Bharat / state

जनआशीर्वाद यात्रा : विरोधीपक्षांना आदिवासी आणि ओबीसी महिला मंत्री झाल्याचे दुःख; केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा आरोप - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारती पवार

राज्याच्या विकासासाठी व देशाच्या विकासासाठी तुमची मुलगी म्हणून मी नक्कीच काम करेन. हे काम करतांना नाशिक जिल्ह्यावर माझे विशेष लक्ष राहणार असल्याचे माझे प्रयत्न राहील असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारती पवार यांनी चांदवड येथील जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी केले आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार
author img

By

Published : Aug 18, 2021, 7:52 AM IST

नाशिक - शिवसेनेचा टॅगलाईन चोरल्याचा आरोप हा खोटा असून विरोधी पक्षांना आदिवासी, ओबीसी महिला मंत्री झाल्याचे दुःख आहे. त्यामुळे ते असे आरोप करीत आहेत, असा घणाघाती टोला विरोधी पक्षांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लगावला आहे. राज्याच्या विकासासाठी व देशाच्या विकासासाठी तुमची मुलगी म्हणून मी नक्कीच काम करेन. हे काम करतांना नाशिक जिल्ह्यावर माझे विशेष लक्ष राहणार असल्याचे माझे प्रयत्न राहील असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारती पवार यांनी चांदवड येथील जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी केले आहे.

देशामध्ये 55 कोटी तर राज्यात पाच कोटी जनतेचे लसीकरण झाले

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यावेळी चांदवड येथे पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, देशातील नागरिकांचे आरोग्य समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कल आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहे. देशांमध्ये 55 कोटी तर राज्यात पाच कोटी जनतेची लसीकरण झाले आहे. असे सांगून पवार म्हणाले की, राज्यातील जनतेला अधिक चांगले आरोग्य मिळावे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे.आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील सर्व राज्य व आरोग्याच्या दृष्टीने काटेकोरपणे लक्ष आहे. त्यामुळे देशात आरोग्य संपदा लाभावी म्हणून आरोग्य विभाग पावले उचलत असून येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना जाणवेल असे पवार यांनी या वेळी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

भाजपाची विचारधारा ही अतिशय सरळ आणि स्पष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसेच भाजपची विचारधारा ही अतिशय सरळ आणि स्पष्ट आहे. परंतु विरोधी पक्षांना ती अवघड आणि जड वाटत आहे. शिवसेनेची टॅगलाईन चोरली असा आरोप करून विनाकारण भाजपाला बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहे. तालिबानी नागरिक भारतात येत आहेत म्हणून कोविड प्रसार वाढेल या भीतीने आतापासूनच उपाययोजना करण्यात येत आहे. असे सांगून ते म्हणाले की मी जनतेने निवडून दिलेल्या खासदार म्हणून निवडून आलेली आहे मंत्रिपदाची माळ माझ्या गळ्यात पडली म्हणून जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नागरिकांच्या समस्या जाणून घेत सोडविणार -

मंत्रिपदाची शपथ घेतांना सर्व नाशिक जिल्ह्याची जनता माझ्या डोळ्यासमोर होती असे भावनिक उद्गार देखील त्यांनी यावेळी काढले आहे. राज्याच्या आरोग्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे सर्वच राज्यांवर काटेकोरपणे लक्ष असून महाराष्ट्रावर देखील आरोग्याच्या बाबतीत ते विशेष काळजी घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिलेल्या केंद्रातील विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी व नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यावर भर देण्यासाठी हा जन आशीर्वाद दौरा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.