ETV Bharat / state

'जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी नाशिकमध्ये कोरोना रुग्णालये उभारावीत' - उद्योगांचे कोरोना रुग्णालय

उद्योग सुरू करताना महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्तींचे पालन काटेकोरपणे केले जात नसल्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. यासंदर्भात उद्योगांनी स्वप्रमाणपत्र देऊन उद्योग सुरू केले आहेत.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Aug 1, 2020, 4:55 PM IST

नाशिक - मोठ्या उद्योगांनी या बिकट काळात कोरोना काळजी केंद्रे आणि रुग्णालये उभारावीत, अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये तसेच सातपूर, अंबड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नरया तालुक्यांमधील औद्योगिक कामगारांमध्ये कोरोना लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा गावागावांमध्ये प्रसार होत आहे. परिणामी वाढत्या रुग्णांचे विलगीकरण करणे व त्यांना उपचार उपलब्ध करणे, यात अनेक अडचणी येत आहेत.अनेक रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नाहीत व त्यांना अनेक रुग्णालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. तसेच खासगी रुग्णालयांकडून या रुग्णांना अवाजवी बिले आकारून प्रचंड पिळवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड कोरोना रुग्णालये उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी उद्योगांशी चर्चा करावी, असे कराड म्हणाले.

उद्योग सुरू करताना महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्तींचे पालन काटेकोरपणे केले जात नसल्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. यासंदर्भात उद्योगांनी स्वप्रमाणपत्र देऊन उद्योग सुरू केले आहेत. परंतु, शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्ती, सूचनांचे पालन होते की नाही हे बघण्याची कुठलीही प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात नाही. उद्योजकांच्या स्वप्रमाणपत्रावर विश्वास ठेवणे अवघड आहे. अनेक उद्योगात या सर्व अटी, शर्ती व सूचनांचे पालन केले जात नाही, असा आरोपही डॉ. कराड यांनी केला.

काही उद्योगांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, यांनी प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी
उद्योजकांनी महाराष्ट्र शासनाच्या अटी शर्तीचे पालन केले की नाही? हे तपासण्याची व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे डॉ. कराड यांनी म्हटले आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही लागण होत आहे. अशा रुग्णांना विलगीकरण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी तालुकानिहाय व शहरांमध्ये त्यांच्या खर्चाने कोरोना काळजी केंद्र व विशेष कोरोना रुग्णालये उभारावेत. असे झाल्यास शासन व प्रशासनावर दबाव कमी होईल व जिल्‍ह्यातील रुग्‍णांना विलगीकरण करणे व उपचार करणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.