नाशिक - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मोठ्या भावानेच लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिंडोरी तालुक्यात घडली. मडकीजांब शिवारातील जुना जांबुटके रस्त्यावरील वाघोबा मळा येथे ही घटना घडली आहे. कैलास वडजे (३०) असे हत्या झालेल्या भावाचे नाव आहे.
हेही वाचा... CORONA VIRUS : हिंगोलीत बॉयलर दहा रुपये किलो; तरीही ग्राहकांची पाठ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास याच्या घरात मोठ्या भावानेच त्याच्यावर, पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत वाद निर्माण केला. त्यातून राग अनावर झाल्याने मोठा भाऊ सुनिल वडजे (३२) याने कैलासवर प्राणघातक हल्ला केला. कैलास याला गंभीर मार लागल्याने त्याला दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृतीच जास्त बिघाड झाल्यामुळे नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान कैलासला मृत घोषीत करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा... दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण
सदर घटनेची पहाणी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षकांनी केली आहे. मारहाण आणि हत्या करणारा संशयित आरोपी गोटीराम उर्फ सुनिल वडजे (३२) याला पोलीसांच्या ताब्यात घेतले असून पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे करत आहे.