नाशिक - जुन्या कांद्याचा साठा असताना नवा कांदा देखील बाजारात आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवणे गरजेचे असून त्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डाॅ. भारती पवार यांनी केली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे निर्यातबंदी उठविण्याकडे लक्ष जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
लवकरच कांदा निर्यात खुली होणार -
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातील कांदा प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. दिल्लीतल्या आंदोलनामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर मोठ्या प्रमाणात बैठका सुरू असल्याने मंत्री व्यस्त आहे. दिल्लीतल्या आंदोलनाला राजकीय वळण दिले जात आहे. कांदा प्रश्नावर याच आंदोलनामुळे तोडगा निघण्यास उशीर होत आहे. मात्र, लवकरच कांदा निर्यात खुली करण्यासंदर्भात निर्णय होईल असे पवार यांनी सांगितले.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान -
शेतकऱ्यांच्या नावाखाली दिल्लीत सुरू आंदोलनाला शेतकऱ्यांचे हे नाव असून हे राजकीय आंदोलन आहे. दिल्लीतल्या आंदोलनामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असून कांंदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय होत नाही. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि कृषिमंत्री तोमर यांच्याशी निर्यातबंदी उढवण्याबाबत बोलणे झाले आहे. असे पवार यांनी सांगितले.