नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी गावात अद्यापही मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत मतदान न करण्याचा निर्यण घेतला आहे. त्यांनी यासंदर्भातील पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे.
हे वाचलं का? - 'रोड नाही, तर व्होट नाही' रस्त्याअभावी पिंपळगाववासियांची फरफट
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या गावात 50 पेक्षा अधिक कुटुंब राहतात. गावाची लोकसंख्या जवळपास ६०० पेक्षा अधिक आहे. मात्र, गावात पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, शाळेची इमारत, अंगणवाडी, घरकुल, शौचालये अशा सुविधा नाही. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला पत्र व्यवहार केला. मात्र, सर्वांनीच दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचलं का? - पुन्हा किती गर्भवती महिलांना खाटेवरून रुग्णालयात न्यायचं? करवाडी ग्रामस्थांचा आमदारांना प्रश्न
दरम्यान, इगतपुरीत तालुक्यातील खैऱ्याची वाडी येथील नागरिकांनी सुद्धा मुलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्यण घेतला आहे.