ETV Bharat / state

नाशिकमध्ये पुन्हा कठोर निर्बंध; राजकीय, सामाजिक सोहळ्यांवर बंदी - छगन भुजबळ - ban on political and social gatherings in nashik

पहिल्या व दुसर्‍या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक गंभीर असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्यात निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणी करा, अशा सूचना मोदी यांनी दिल्या आहेत, असेही भुजबळ म्हणाले.

Ban on political and social gatherings in nashik said chhagan bhujbal
नाशिक निर्बंध कठोर; राजकीय, सामाजिक सोहळ्यांवर बंदी - छगन भुजबळ
author img

By

Published : Jul 17, 2021, 9:29 PM IST

Updated : Jul 17, 2021, 10:22 PM IST

नाशिक - तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात कोणतीही सूट अथवा शितीलता देण्यात आली नसून राजकीय व सामाजिक सर्व कार्यक्रम आणि सोहळ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मात्र, ऑनलाईन स्वरुपातवरील कार्यक्रम होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कोरोना परिस्थिती आढावा बैठक पार पडली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री भुजबळ यांनी ही माहिती दिली.

प्रतिक्रिया

'३ लाख ७९ हजार नागरिकांचे लसीकरण' -

जिल्ह्यात जून महिन्यात ७ हजार ५९१ कोरोना रुग्ण उपचार घेत होते. सद्यस्थितीत या संख्येत घट झाली असून एक हजार ५४८ रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरी लाट आली तेव्हा कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट ४१ टक्के होता. तो आता २.२ टक्के झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या तुलनेत कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साधारण ३ लाख ७९ हजार लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये लस पुरवठा सुरळीत होईल, अशी चिन्हे असून कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी निर्बंधात शिथीलता देणे शक्य नसल्याचे भुजबळ म्हणाले.

'नागरिकांनीही वेळेच्या मर्यादेचे पालन करावे' -

दुकानदार व व्यावसायिकांना सकाळी सात ते दुपारी चार ही दुकाने सुरु ठेवण्यासाठी दिलेली मुभा पुरेशी आहे. नागरिकांनीही वेळेच्या मर्यादेचे पालन करावे. दिलेली वेळ खरेदीसाठी पुरेशी आहे. त्यात कोणताही बदल सद्यस्थिती केला जाणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले आहे. तसेच जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधाचे व संचारबंदीचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

'४०० मेट्रिक टन ऑक्सिजन साठवण क्षमता' -

तिसर्‍या लाटेचा धोका बघता जिल्ह्याला ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन साठवण क्षमतेची जिल्ह्याने सज्जता ठेवली आहे. त्यापैकी २४० मेट्रिक टन क्षमता शहरासाठी व ग्रामीण भागासाठी १०६ मेट्रिक टन क्षमतेचे उदिष्ट आहे. पीएसए प्रकल्पाच्या माध्यमातून हवेतून ८० मेट्रिक टन आँक्सिजन निर्मिती केली जाईल. २८० मेट्रीक टन इतर माध्यमातून व ४० मेट्रीक टन सिलिंडरच्या माध्यमातून अशी एकूण ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण

Last Updated : Jul 17, 2021, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.