ETV Bharat / state

नाशिक : बांधकामासाठी आता स्टील ऐवजी होणार बांबूचा वापर; मुक्त विद्यापीठाने तयार केला पथदर्शी नमुना - ycm university news

महाराष्ट्र शासनाने बांधकाम दर सूचीमध्ये बांबूच्या बारा घटकांची सूची मान्य केली आहे. यामुळे आता बांबूचा वापर बांधकामांमध्ये होणार आहे. येत्या काळात बांधकाम ही पर्यावरण पूरक आणि कमी खर्चात होणार आहेत.

Bamboo will be in construction instead of steel, ycm university innovation
नाशिक : बांधकामासाठी आता स्टील ऐवजी होणार बांबूचा वापर; मुक्त विद्यापीठाने तयार केला पथदर्शी नमुना
author img

By

Published : Dec 13, 2020, 5:04 PM IST

नाशिक - बांबू हा एक उपयुक्त आणि सर्वसमावेशक घटक म्हणून ओळखला जातो. आजवर आपण बांबूचा वापर कच्ची घरे शोभेच्या वस्तू टोपल्या किंवा बांधकाम व्यवसायामध्ये आधार देण्यासाठी केला जात असल्याचे पाहिले आहे. मात्र आता बांबूचा वापर हा आधुनिक बांधकामे करण्यासाठी देखील होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने बांधकाम दर सूचीमध्ये बांबूच्या बारा घटकांची सूची मान्य केली आहे. यामुळे आता बांबूचा वापर बांधकामांमध्ये होणार असल्याने येत्या काळात बांधकामही पर्यावरण पूरक आणि कमी खर्चात होणार आहेत. या क्षेत्रातील तज्ञ हे मुक्त विद्यापीठामध्ये देखील असल्याने बांबूच्या एका पथदर्शक बांधकामाचा नमुना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने निर्माण करण्यात आला आहे.

बांधकामासाठी होणार आता स्टील ऐवजी होणार बांबूचा वापर...

पर्यावरण पूरक आणि कमी खर्चात होणार बांधकाम
बांबूचे छत, बांबूचे कॉलम यांची निर्मिती करून काँक्रीटचे अच्छादन असलेले पार्टिशन, भिंत असे मजबूत बांधकाम असलेले शेतकरी माहिती केंद्र सभागृह नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परिसरात उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात कुठल्याही बीड किंवा सिमेंटचा वापर केला गेला नाही. संपूर्ण बांधकाम हे बांबूच्या आधारावर करण्यात आले आहे. यामुळे हे सभागृह आता जिल्हाभरात कुतूहलाचा विषय ठरत आहे. तसेच येत्या काळात बांबूपासून गृह निर्मिती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

भूकंप रोधक पर्यावरण व ऊर्जा बचत करणारे बांबूचे सभागृह
मुक्त विद्यापीठाने बांबूचा वापर कॉलम, बीम आणि लोखंडी सळ्यांना पर्याय म्हणून केल्यानं कमी खर्चात भूकंप रोधक पर्यावरण व ऊर्जा बचत करणारे बांबूचे सभागृह बांधून येत्या काळात पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला वाट मोकळी करून दिली आहे. येत्या काळात रस्ते इमारती बांधकाम देखील बांबूचा लोखंडाला पर्याय म्हणून उपयोग करता येणार आहे.

हेही वाचा - नाशिक : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत

हेही वाचा - गोरगरीब जनतेसाठी सतत लढणाऱ्या शरद पवारांना शुभेच्छा - छगन भुजबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.