ETV Bharat / state

"आव्हाडांसोबत चर्चा करुन त्यांचे गैरसमज दूर करू" - balasaheb thorat on jitendra awhad

जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. मात्र, बीडमध्ये केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

balasaheb thorat
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jan 30, 2020, 5:58 PM IST

नाशिक - जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन त्यांचे ग्रैरसमज दूर करणार असल्याचे मत महसुलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. थोरात हे नाशिक येथील विभागीय बैठकसाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बाळासाहेब थोरात यांची जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

थोरात म्हणाले, सध्या अनेक वादग्रस्त वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहेत. असे काही बोलताना कोणाची मानहानी होणार नाही किंवा काही वाद होणार नाही याची काळजी आम्ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

थोरातांचे मुनगंटीवारांना प्रत्युत्तर -

आमच्या सरकारविरोधात बोलण्याची जबाबदारी मुनगंटीवार यांच्याकडे दिली असल्याचे मला वाटत आहे. तसेच आता सत्ता नसल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. आमचे सरकार पाच वर्षे चांगले चालणार असल्याचेही थोरात म्हणाले.

राज ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीवर थोरातांची प्रतिक्रिया -

भाजप व मनसे एकत्र येतील असे वाटत नाही. राज ठाकरे यांना आम्ही जवळून पाहिले आहे, त्यांच्या विचारापासून ते दूर जाणार नाहीत. आत्ता त्यांनी सीएएबाबत जी भूमिका घेतली ती पूर्वीच्या पद्धती प्रमाणेच घेतली आहे.

Intro:Breaking -

*बाळासाहेब थोरात ऑन वादग्रस्त वक्तव्य*

- सध्या अनेक वादग्रस्त वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येताय, काहीही बोलत असतांना कोणाची मानहानि होणार नाही किंवा काही वाद होणार नाही याची काळजी आम्ही सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे अस मला वाटत

*बाळासाहेब थोरात ऑन जितेंद्र आव्हाड* -
- कालच जितेंद्र आव्हाड बोलले मात्र इंदिरा गांधींबाबत काही समज गैरसमज त्यांचे असतील तर ते आम्ही चर्चा करून दूर करू शकतो अस वाटत
- महाविकास आघाडी भक्कम आहे निट काम चालू आहे

*बाळासाहेब थोरात ऑन मुनगंटीवार* -
- सरकारविरोधी बोलण्याची जबाबदारी मुनगंटीवारांकड़े दिसते आहे
- त्यांची अवस्था वैफल्यग्रस्त दिसते आहे
- आमच महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष छान चालेल

*बाळासाहेब थोरात ऑन राज ठाकरे आशीष शेलार भेट* -
- भाजप मनसे एकत्र येतील अस वाटत नाही, राज ठाकरे यांना आम्ही जवळून पाहिले आहे, त्यांच्या विचारापासून ते दूर जाणार नाहीत, आत्ता त्यांनी caa बाबत जी भूमिका घेतली ति पूर्वीच्या पद्धती प्रमाणेच घेतलीBody:बाळासाहेब थोरात हे नाशिक येथे नियोजन बैठकीसाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत होतेConclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.