नाशिक - संजय राऊत यांनी तो विषय संपवलेला आहे. आता तो विषय राहिला नाही. आम्ही देवेंद्र फडणवीसांच्याच ट्विटला उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमध्ये आयोजित एका खासगी कार्यक्रमादरम्यान दिली.
राज्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दलच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. यात संजय राऊत यांचा विषय आता वाढवू नका, असे बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर दिल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - एलिमेंट मोबाईल शोरूम चोरी प्रकरण; कुख्यात चादर गँगचा म्होरक्या गजाआड
दरम्यान, जेव्हा-जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली आहे. तेव्हा काँग्रेसला पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत. तसेच जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हे विधान मागे घेत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - तीन वर्षांपासून मंदिरात बसून चिमुरडे घेत आहेत शिक्षण