ETV Bharat / state

मक्यासह भरडधान्य खरेदीसाठी बारदानाचा प्रश्न सुटला, नाफेडकडून बारदान्याची खरेदी

रब्बीतील भरड धान्य खरेदीसाठी आवश्यक असणारे बारदाना राज्य सरकार केंद्र शासनाच्या जूट कमिशनर कोलकाता यांच्याकडून घेत असते. त्यानुसार केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे बारदाना खरेदीसाठी राज्य शासनाने आतापर्यंत ५८.५० कोटी वेळोवेळी अदा केले आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा बारदाना उत्पादनावर परिणाम झाला असून अद्याप जूट कमिशनर यांच्याकडून राज्यसरकारला बारदान्याचा पुरवठा झाला नाही.

bardana purchases nashik  bardana purchase from nafed  chhagan bhujbal latest news  नाशिक लेटेस्ट न्यूज  बारदाना खरेदी नाशिक
मक्यासह भरडधान्य खरेदीसाठी बारदानाचा प्रश्न सुटला, नाफेडकडून बारदान्याची खरेदी
author img

By

Published : Jun 11, 2020, 7:21 PM IST

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परीस्थितीत जूट कमिशनर यांच्याकडून बारदाना उपलब्ध झाला नाही. त्यामुळे भरड धान्य खरेदी करण्यासाठी नाफेडकडे शिल्लक असलेले १० लाख बारदाना खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाफेडमार्फत भरडधान्य केंद्रावर सदर बारदाना तातडीने पाठविण्यात येत आहे. त्यामुळे बारदान्याअभावी रखडलेली मक्यासह इतर भरडधान्य जलद गतीने खरेदी केले जाईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मक्यासह भरडधान्य खरेदीसाठी बारदानाचा प्रश्न सुटला, नाफेडकडून बारदान्याची खरेदी

रब्बीतील भरड धान्य खरेदीसाठी आवश्यक असणारे बारदाना राज्य सरकार केंद्र शासनाच्या जूट कमिशनर कोलकाता यांच्याकडून घेत असते. त्यानुसार केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे बारदाना खरेदीसाठी राज्य शासनाने आतापर्यंत ५८.५० कोटी वेळोवेळी अदा केले आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा बारदाना उत्पादनावर परिणाम झाला असून अद्याप जूट कमिशनर यांच्याकडून राज्यसरकारला बारदान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असलेला १० लाख बारदाना खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नाफेडला ५.८४ कोटी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनला अग्रीम देण्यात आले असून नाफेडकडून प्रत्यक्ष बारदाना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे भरडधान्य खरेदीसाठी लागणाऱ्या बारदानाचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात मक्यासह भरडधान्य खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने भरडधान्य खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात भरडधान्य शिल्लक राहिले आहे. तसेच केंद्र शासनाच्या जूट कमिशनर कोलकाता यांच्याकडून घेण्यात येत असलेले बारदाना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध न होऊ शकल्याने अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून प्रथमतः रेशन दुकारांकडे उपलब्ध असलेले जुने बारदान घेतले जात होते. मात्र, तेही संपल्याने भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असलेला १० लाख बारदाना खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाफेडमार्फत भरडधान्य खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.