ETV Bharat / state

Baban Gholap Resign : शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देताच बबनराव घोलप यांनी स्पष्टचं सांगितलं, गद्दारांना पक्षात... - खासदार हेमंत गोडसे

Baban Gholap Resign : ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानं नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलायं. माजी खासदार भानुदास वाकचौरे ठाकरे गटात प्रवेश केल्यानं घोलप नाराज असल्याचं सांगितलं जातयं.

नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का
Baban Gholap Resign
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 10:57 PM IST

दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपण निर्णय घेऊ

नाशिक Baban Gholap Resign : शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप (Baban Gholap Resign) यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलायं. यामुळे ठाकरे गटाला नाशकात मोठा धक्का बसलायं. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणुक लढवण्याची ते तयारी करत होते, अशातच माजी खासदार भानुदास वाकचौरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलायं. यानंतर घोलप यांना संपर्क प्रमुखपदावरुन हटवल्यामुळं ते नाराज होते. मी अद्याप उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप शिवसेनेतच असून दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपण निर्णय घेऊ असंही घोलप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलयं. (Shivsena Controversy Thackeray vs Shinde)

वाकचौरेंच्या उमेदवारीच्या चर्चेने घोलप नाराज : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीचं आश्वासन दिलं होतं. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव यांनी सूचना दिल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप नाराज होते. यानंतर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेत, उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला देखील त्यांनी विरोध केल्याचं सूत्रांनी सांगितलयं. (Nashik Shivsena News)

काय म्हणाले घोलप : मी माझ्या उपनेते पदाचा राजीनामा देतोय. शिर्डी किंवा अमरावती मला विचारले होते मी शिर्डी सांगितले होते. मी 8 महिने या भागात काम केले, 30 हुन अधिक शाखांचं उद्घाटन केलं. भाऊसाहेब वाकचौरे, जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत, असं मला कळताच मी उद्धव साहेबांना विचारलं होतं. भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवार करायचे होते तर मला शब्द का दिला होता? माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा मी उद्धव ठाकरेंना व्हॅट्सऍप केलायं. संजय राऊतांनी मला उद्या भेटायला बोलावले असून मी जाणार आहे. तिथे काय चर्चा होते. यावर मी कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार असल्याचं माजी मंत्री बबन घोलप यांनी म्हटलंयं.

  • कोण आहेत घोलप : बबन घोलप हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी युती काळात मंत्रीपदही भूषवलयं. शिवसेनेत फुट पडल्यानंतर खासदार हेमंत गोडसेंसह शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला होता. पण, घोलप यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केलं होत.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis Hearing : शिवसेना, सरकारचं काय होणार? शिंदे, ठाकरे गटाचं लक्ष 'सर्वोच्च न्यायालयाकडं'
  2. Thackeray Vs Shinde : मुंबईत ठाकरे-शिंदे गटात बॅनरवॉर; शहरातील अनेक भागात दोन्ही गटांकडून बॅनरबाजी
  3. Mumbai Crime : शिवसेना शिंदे गटाच्या अंधेरी विभाग प्रमुखांवर हल्ला, अज्ञात मारेकऱ्यांनी फोडल्या गाडीच्या काचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.