नाशिक: नाशिकच्या म्हसरूळ भागातील एका रो हाऊसमध्ये भाडेतत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या ज्ञानदीप आश्रमातील 13 अल्पवयीन मुली अंघोळ करत असताना त्यांचे मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग करून संचालक संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे यांने ब्लॅकमेलिंग करून पीडित मुलींवर अत्याचार केल्याचे पिढीत मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आतापर्यंत 6 अल्पवयीन मुलीवर या नराधामाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
त्यांच्यावरही अत्याचार झाल्याचे समोर: समाजसेवाच्या नावाखाली वासनांध हर्षलने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले असून, या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी एका पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून हर्षलला पोलिसांनी बेड्या ठोकले आहे. आश्रमातील अन्य मुलींचे जबाबदार नोंदवले असता 5 मुलींच्या जबाबदातून त्यांच्यावरही अत्याचार झाल्याचे समोर आलं आहे.व यावेळी पोलिसांनी संशयित हर्षल विरोधात बलात्कार, पोस्को, ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत.
सत्संगच्या नावाखाली कृतकृत्य: आधार आश्रमातील पीडित अल्पवयीन मुलींना संशयित हर्षल सत्संगाच्या नावाखाली सटाणा वीरगावात वारंवार घेऊन जात होता. तेथे मुलींचे अंघोळ करताना फोटो, व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करून त्यावरून तो पीडित मुलींना धमकावत असल्याचे मुलींनी दिलेल्या जबाबाबत समोर आले आहे.
देणगीसाठी असा फंडा: आधार आश्रम चालवण्यासाठी संशयित हर्षल याने विविध दानशूर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इंस्टाग्राम, फेसबुक तसेच सोशल मीडियाचा वापर केला. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधीना संस्थेत बोलून आश्रमात विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेत, आणि त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर तो टाकत होता.
महिला व बालविकास मंत्र्यांचे आदेश: नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील 6 अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला 7 दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला व बालविकास प्रधान सचिव यांना दिले आहेत. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने 6 अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे पत्रात म्हटले आहे.