ETV Bharat / state

आशा-गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने १५ जूनला लाक्षणिक संपाचा इशारा - asha workers demands nashik

आशा आणि गटप्रवर्तक यांच्या विविध मागन्या मान्य होत नसल्याने 15 जूनला महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Asha workers one day strike nashik
आशा संघटना आंदोलन इशारा
author img

By

Published : May 20, 2021, 4:17 PM IST

नाशिक - आशा आणि गटप्रवर्तक यांच्या विविध मागन्या मान्य होत नसल्याने 15 जूनला महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

माहिती देताना राजू देसले, राज्याध्यक्ष, आयटक

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय नेमबाज मोनाली गोऱ्हेंचं कोरोनामुळे निधन, सकाळीच वडिलांचाही मृत्यू

आशा व गटप्रवर्तक यांना कामाचा उचित मोबदला देणे, आशा गटप्रवर्तक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवणे, त्यांना पुरेशी सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देणे, यांसारख्या विविध मागण्या मान्य झाल्या नाही. 14 जूनपर्यंत राज्य शासनाने आशा आणि गटप्रवर्तक यांच्या मागण्यांची दखल घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर कामबंद उपोषण अटळ असल्याचे आयटकचे राज्याध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले.

विविध मागण्या मान्य होत नसल्याने आशा-गटप्रवर्तक संतप्त

कोरोना काळामध्ये राज्यभरातील हजारो आशा आणि गटप्रवर्तक आपल्या जिवाची बाजी लावून आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. या काळात अनेकदा आपल्या हक्कांसाठी आशा गटप्रवर्तकांकडून एक दिवसीय आंदोलन केले गेले, मात्र तरीही केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मागण्यांची दखल घेत नसल्याने आता राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा शासनाला दिला आहे. त्यामुळे, आशा आणि गटप्रवर्तक यांच्या मागण्यांची दखल घेत राज्य शासन त्यांच्या मागण्या मान्य करणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - कोरोना काळात पालकांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना जिल्हास्तरीय कृती दलाचा आधार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.