ETV Bharat / state

..तर अंत्योदय एक्सप्रेस पूलावरून कोसळली असती, चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

जर काही दुर्घटना घडली असती तर रेल्वे पूलावरून खाली कोसळली असती.

author img

By

Published : Jul 18, 2019, 8:29 AM IST

Updated : Jul 18, 2019, 12:34 PM IST

...तर रेल्वे कोसळली असती पूलावरून खाली, चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

नाशिक - मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा ट्रॅकवरून घसरल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. ही घटना इगतपुरी येथील भाम नदीच्या पूलावर घडली. मात्र, यामध्ये सुदैवाने रेल्वेची मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस मधील प्रवासी 'राज्यराणी' एक्सप्रेसने मनमाडकडे रवाना झाले आहेत. मनमाडहून दुसऱ्या एक्सप्रेसने प्रवासी गोरखपूरसाठी पुढील प्रवास करणार आहेत. या अपघातामुळे प्रवासी 6 तासांपासून रेल्वेत अडकून पडले होते.

..तर अंत्योदय एक्सप्रेस पूलावरून कोसळली असती, चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोरखपूरकडे निघालेल्या अंत्योदय एक्सप्रेसचा 2 क्रमांकाचा डबा इगतपुरी येथील भाम नदीच्या पूलावर घसरला असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तत्काळ गाडी थांबवली. त्यानंतर या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी या डब्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, पुलावरच डबा घसरल्याने दुरुस्तीचे काम करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, जर काही दुर्घटना घडली असती तर गाडी पूलावरून खाली कोसळली असती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. सध्या या ठिकाणी अंत्योदय एक्सप्रेसच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे नाशिक-मुंबईकडे जाणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत.

Intro:Body:

नाशिक न्यूज फ्लॅश

-रेल्वेची मोठी दुर्घटना टळली

-मुबई गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस चा डबा ट्रॅक वरून घसरला,

-इगतपुरी येथील भीमा नदीच्या ब्रिज वरील घटना.

-दुर्घटना घडली असती तर गाडी पुलावरून खाली कोसळली असती,

-रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे मुळे दुर्घटना टळली...

Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.