नाशिक : नाशिक जिल्ह्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धडाकेबाज कारवाई करत अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना रंगेहाथ लाच घेताना (Anti corruption department Nashik ) पकडले. वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल 125 कारवाया केल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाया करण्यामध्ये नाशिक जिल्ल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नाशिकच्या लाच लुचपत विभागाअंतर्गत नाशिक परिक्षेत्रात 2022 ( 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2022 ) दरम्यान या संपूर्ण वर्षात 125 यशस्वी सापळा रचत कारवाई करण्यात आल्या आहेत. अन्य चार भ्रष्टाचाराच्या विरोधातील गुन्हे दाखल केले आहेत. राज्यात या कारवाईमध्ये नाशिकच्या दुसरा क्रमांक लागतो. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या कारवायांकडे बघितले असता ते स्पष्ट (action against bribe takers in 2022) होते.
अशा आहेत कारवाया : नाशिकला प्रतिबंधक विभागामार्फत नाशिकमध्ये महसूल विभागात 21, पोलीस विभागात 30, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 15, महाराष्ट्र राज्य विद्युत विभागामध्ये 10, आदिवासी विकास विभागात 4, शिक्षण विभागात 4, खाजगी व्यक्ती 9 अशा कारवाई करण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये 125 कारवाया सापळा रचून केल्या असून या कारवाईमध्ये 185 भ्रष्ट अधिकारी कर्मचारी गुंतले (Anti Corruption Department Action) आहेत. या सर्व कारवायांमध्ये वर्गात 1 ते 10, वर्ग 2 चे 25,वर्ग 3 चे 92, वर्ग 4 चे 10 शासकीय अधिकारी व कर्मचारी आहेत. इतर लोकसेवक किंवा खाजगी व्यक्ती 38 आहेत. तसेच अन्य भ्रष्टाचारांचे गुन्हे दाखल केले असून 14 शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी विरोधात कारवाई करण्यात आली (bribe takers in Nashik district) आहे.
लाच हा गुन्हा : लाच देणे किंवा घेणे हा कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा (Anti corruption department ) आहे. या गुन्ह्याविरोधात लाच लुचपत विभाग कारवाई करत असतो. शासकीय, लोकसेवक त्यांचे काम कायदेशीरपणे प्रामाणिकरीत्या करत असेल आणि ते काम बेकायदेशीर रित्या करून घेण्यासाठी कोणी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा तो पण एक अपराध आहे. ज्याप्रमाणे लाज घेण्यासंदर्भात किंवा मागण्या संदर्भात एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होतो. त्याचप्रकारे लाच देण्यासंबंधी एखाद्या विरोधात लाच देण्याच्या गुन्हा दाखल होतो. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कायदेशीर कामकाज करून देण्यासाठी कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही लाचेची मागणी करत असेल, तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले (bribe takers in Nashik district) आहे.