ETV Bharat / state

कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदुबाबावर गुन्हा दाखल करा;अंनिसची मागणी - con Baba Ganesh Jagtap

लॉकडॉऊन काळात इंदिरानगर परिसरातील एका आश्रमशाळेतील सामाजिक कल्याणकारी कामाच्या नावाखाली वृद्धाला 11 लाखांचा गंडा गणेश जगताप या भोंदुबाबाने घातला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुंबई येथून शिताफीने शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत.

भोंदुबाबा
भोंदुबाबा
author img

By

Published : Dec 22, 2020, 9:12 PM IST

Updated : Dec 22, 2020, 9:30 PM IST

नाशिक - पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भोंदुबाबाचे अनेक कारनामे समोर येत आहे. गणेश जगताप ह्या भोंदुबाबाने अनेकांची करोडो फसवणूक केले आहेत. त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे..

लॉकडॉऊन काळात इंदिरानगर परिसरातील एका आश्रमशाळेतील सामाजिक कल्याणकारी कामाच्या नावाखाली वृद्धाला 11 लाखांचा गंडा गणेश जगताप या भोंदुबाबाने घातला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुंबई येथून शिताफीने शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत.

कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदुबाबावर गुन्हा दाखल करा
भोंदुबाबाचे अघोरी प्रकार-

पैशाच्या हव्यासापोटी गणेश जगताप हा भोंदुबाबा नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. तुम्हाला जमिनीतून लाखो रुपये मिळतील असे सांगून त्यांना निखाऱ्यावर चालण्यास सांगणे तसेच भक्तांना चाबकाचे फटके देत होते. अशा प्रकारचे व्हिडीओदेखील निर्धास्तपणे सोशल मीडियावर टाकत असत. बाबा अघोरी प्रकार करण्यास सांगत असल्याने नागरीकदेखील पैशाच्या हव्यासापोटी त्याला लाख रुपये देत होते.

भोंदुबाबावर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करावी-

शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गणेश जगताप भोंदुबाबा विरोधात 53 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. पैशांचे आमिष दाखवून अघोरी विद्या करण्याचे सांगून बाबाने भक्तांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना त्याने फसवले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.

भोंदुबाबाच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचे आवाहन -
पोलिसांनी भोंदुबाबाकडून सुमारे 40 बोगस सोन्याची बिस्किटे आणि कोरे स्टॅम्प पेपरदेखील हस्तगत केले आहेत. विविध बहाण्याने आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक झाल्यास नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन गुन्हे शाखा आणि इंदिरानगर पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

Last Updated : Dec 22, 2020, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.