नाशिक : आज पहाटे 04:04 वाजता नाशिकपासून पश्चिमेला 89 किमी अंतरावर 3.6 रिश्टर स्केलचा ( West of Nashik earthquake ) भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 5 किमी होती, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ( national centre for seismology ) म्हटले आहे.
काही दिवसांपुर्वीच कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. किल्लारीसह (Earthquake Killari) परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजून, सात मिनिटे व एकवीस सेकंदाला भूकंपाचा भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांना (Mild earthquake hits Killari) बसला होता. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल असून, भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात असल्याचे व या धक्क्याची खोली जमिनीत पाच कि.मी. अंतरावर असल्याचे लातूरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले होते. भूकंप किल्लारीसह यळवट, सिरसल, पारधेवाडी, कार्ला, कुमठा, नदीहत्तरगा, सांगवी, जेवरी, तळणी, बाणेगावसह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांत जाणवला. गेल्या सहा महिन्यांपासून किल्लारीत भूकंपाचा धक्का जाणवला नाही.
-
An earthquake of magnitude 3.6 occurred 89km West of Nashik, Maharashtra at around 04:04am today. The depth of the earthquake was 5 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/ULIdOrtiRN
— ANI (@ANI) November 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An earthquake of magnitude 3.6 occurred 89km West of Nashik, Maharashtra at around 04:04am today. The depth of the earthquake was 5 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/ULIdOrtiRN
— ANI (@ANI) November 22, 2022An earthquake of magnitude 3.6 occurred 89km West of Nashik, Maharashtra at around 04:04am today. The depth of the earthquake was 5 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/ULIdOrtiRN
— ANI (@ANI) November 22, 2022
नागरिकांना अजूनही आठवतो 1993 चा किल्लारीतील भूकंप : 1993 चा महाप्रलयंकारी भूकंप हा 30 सप्टेंबर रोजी झाला होता. तेव्हापासून सप्टेंबर महिन्यात अनेकवेळा भूकंपाचे धक्के बसले. यावर्षी सप्टेंबर महिना अपवाद फक्त किल्लारीकरांना गेला. परंतु जवळच असलेल्या निलंगा तालूक्यातील हासोरी गाव व परिसरात भुकंपाचे अनेक धक्के बसले. शनिवारी मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसताच, अनेक नागरिक घराबाहेर पडले. थंडीच्या कडाक्यातही येथील नागरिकांनी रात्र जागून काढली