नाशिक - निफाड तालुक्यातील सायखेडा गोदापात्रात 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू ( Boy Drown In Godavari nashik ) झाला. गोदावरी नदी पात्रात ताे पोहण्यासाठी गेला हाेता. गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिली.
तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश - गेल्या काही दिवसापासून उष्णतेच्या लाटा वाढू लागले आहेत आणि गोदापात्रात देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात होण्यासाठी तरुणांची गर्दी होऊ लागले मात्र यामुळे दुर्घटनांमध्ये देखील वाढ होऊ लागली दिवसात नाशिक शहराच्या सोमेश्वर गोदापात्रात तिघा जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झालेला आहे तर दोघांना वाचवण्यात यश आलं त्यानंतर निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदापात्रात बुडवून 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारच्या वेळी जावेद शकील अत्तार हा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला आहे. यावेळी स्थानिक युवकांनी तरुणाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पाण्याचा विसर्ग जास्त असल्याने तरुण बुडल्याने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जावेद शकील अत्तार याला बाहेर काढण्यात यश आले.
पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला - पात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेला जावेद शकील अत्तार (18) यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही माहिती सायखेडा येथील नागरिक मनोज कापडी यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती, चांदोरीचे अध्यक्ष सागर गडाख यांना कळवली. फकीरा धुळे, बाळू आंबेकर, केशव किरण वाघ, शंकर डोंगरे, किशोर ससाणे, संकेत घुगे, अरुण दराडे यांनी शोध कार्य केले त्यानंतर तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.
हेही वाचा - Today Weather In India : सावलीत बसा! पुढील पाच दिवस उष्णतेची लाट -हवामान विभाग